चिखली : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे याबाबत निवेदन तहसीलदार,चिखली यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिले. गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा चिखली मेहकर फाटा येथे बसविण्यात आला आहे. आता पर्यंत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण झालेच नाही. फक्त महापुरुषांच्या नावावर राजकारण करून निवडून येणारे नगरसेवक, आमदार, खासदार यांनीही राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सदैव कानाडोळा केला आहे. प्रशासनाचेही दुर्लक्ष केले आहे. नगराध्यक्ष, आमदार, खासदार तालुका, जिल्ह्यासाठी मोठमोठे निधी आणतात. उद्घाटन करण्यासाठी मोठमोठे मंत्री राजकीय नेते येतात. जेव्हा महापुरुषांचा प्रश्न येतो तेव्हा हे लोकप्रतिनिधी बाजूला राहतात. महापुरुषांची जयंती आली की, हार घालून फोटो काढतात . सोशल मीडियावर व्हायरल करतात .प्रशासनाने 12 जानेवारीच्या आत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित करण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली मेहकर फाटा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा निवेदनामध्ये रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी दिला. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर उपाध्यक्ष रमेश अंभोरे, दीपक तायडे, यश बावस्कर, राम बावस्कर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 32