सामूहिक विवाह चळवळ मोठी करण्यासाठी समाजाने पुढे यावे सर्वतोपरी मदत करू– केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा – उदयनगर प्रतिनिधि,रफीक खानभोकरदन येथील मेळाव्यात बुलढाणा सह राज्यातील पालकांनी लावली हजेरी बुलढाणा_5/1/ 2023 भोकरदन येथे महाराष्ट्र मराठा सोयरीक च्या वतीने राज्यातील तिसाव्या मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व थाटात पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातून सुमारे दीडशे वधूवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. तसे पाहता भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण पाल्य व पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येत जुळेल की नाही ही आयोजकांना सुरुवातीपासूनच धाकधूक होती परंतु दुपारी एक नंतर पालक व पाल्यांनी फार मोठ्या संकेत उपस्थिती लावून आयोजकांमधील उत्साह वाढविला. या मेळाव्याला जालना जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, बीड ,उस्मानाबाद, पुणे, मुंबई ,सुरत नंदुरबार अशा अनेक जिल्ह्यांमधून पाल्य व पालकांची मोठ्या संकेत उपस्थिती दिसून आली .भोकरदन येथे ऐतिहासिक वधु वर परिचय मेळावा हा पहिल्यांदाच घेण्यात आलाय त्यामुळे या आगळावेगळा दिमकदार मराठा समाज वधू वर परिचय मेळावा भोकरदन येथील रत्नमाला लॉन्स येथे पार पडला . कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते करण्यात आले तर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आलाय . ते महाराष्ट्र मराठा सोयरीकचे अध्यक्ष सुनील पाटील जवंजाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते , याच मेळाव्याच्या आयोजन व नियोजना दरम्यान श्री जंजाळ पाटील यांच्यावर 18 डिसेंबरला दुसऱ्यांदा हृदय शस्त्रक्रिया पार पडली अशा अवस्थेतही ते कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांमधील उत्साह टिकवून ठेवला. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मराठा समाज व विवाह स्थिती व त्यांचे दूरगामी परिणाम याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून नुकत्याच सोलापूरला नवरदेवांनी काढलेल्या मोर्चा बद्दल चिंता व्यक्त केली . समाज वेळीच सावध झाला नाही तर याहीपेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे ते म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी देखील हजेरी लावली मराठा समाज व विवाहसारखी चिंताजनक बाब यावर आपण सर्वतोपरी मदत करणार असल्यास असल्याचे असे सांगितले यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,जाफराबाद नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सुरेखाताई लहाने ,सुधाकर पाटील दानवे ,माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव , दिलीप वाघ यांनीही सविस्तरपणे समाज बांधवांना मार्गदर्शन केले जाफराबादच्या नगराध्यक्ष सौ लहाने यांनी भोकरदन येथील कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन जाफराबादलाही भविष्यात मेळावा घेऊ अशी घोषणा कार्यक्रम स्थळी केली सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले , त्याचबरोबर सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज श्री गणेश राव राजे जाधव यांनी राहेरी बुद्रुक येथे मेळावा घेण्याची घोषणा केली या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वधर्म समभाव या नात्याने माळी समाज बांधवांनी मेळाव्यात येणाऱ्या सर्व मराठा समाज बांधवांचे गुलाब गुच्छ देऊन स्वागत केले व त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुस्लिम समाज बांधवांनी केली हा आगळावेगळा आदर्श या मेळाव्यांनी निर्माण केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण जीवरग व के डी वाघ यांनी केले व विष्णु दसपुते यांनी आभार मानले.

 

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *