तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगावराजा :- मराठी पत्रकार परिषद मुबंई, संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे सहसंघटक तथा दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार गजानन तिडके यांचा वाढदिवस देऊळगावराजा तालुका पत्रकार संघ तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे व पत्रकारितेचा दांडगा अनुभव असलेले गजानन तिडके हे आजरोजी सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे. सर्वसामान्यांची समस्या असो वा पत्रकारांची कोणतीही अडचण असो, ही अडचण सोडविण्यासाठी गजानन तिडके हे सर्वात पुढे असतात. त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळे व सहकार्याच्या भूमिकेमुळे तिडके यांचे सर्वच राजकिय व सामाजिक संघटनांमध्ये महत्व वाढलेले आहे. त्यांच्या याच गुणांचा फायदा तालुक्यातील पत्रकारांनाही होत आहे. त्यांच्या कार्याची दखल पत्रकार संघाच्या जिल्हा पातळीवरही घेण्यात आली असून त्यांना संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीवर महत्वाचे पद देण्यात आले आहे. या लोकप्रियतेमुळेच आज वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक जणांनी तिडके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश सवडे, शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) जिल्हा उपाध्यक्ष दीपक बोरकर, भाजपाचे प्रविण धन्नावत, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सुरज गुप्ता, प्रकाश खांडेभराड, बंडू झोरे, रफिकभाई बळीराम मापारी, संपादिका सौ. किरण वाघ, गणेश डोके, राहुल नायर, शेख कदीर, विलास जगताप, दत्ता हांडे, शांतू भाग्यवंत, जितेंद्र खंडारे, राजेश खांडेभराड, परमेश्वर खांडेभराड, मुबारकशाह, मुन्ना ठाकूर, विजय जाधव, अमोल जेठे, कासारे आदींनी गजानन तिडके यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
Users Today : 32