बुलडाणा, दि. 10 : कृषी विभागाच्या वार्षिक क्रीडा दि. 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३बाबत जनजागृती करण्यात आली. यात महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा, पौष्टिक तृणधान्य पथनाट्याद्वारे जनजागृती, पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट व पौष्टिक तृणधान्य रांगोळी, हळदी कुंकू व फनी गेम आदी कार्यक्रम घेण्यात आले.विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा, पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. पाककृती स्पर्धेत महिला अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. स्पर्धेकरिता दिलीप जाधव, विवेक गिऱ्हे, विशाल बारोठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. चिखली येथील कृषि सहाय्यक अर्चना खेडकर यांव्सर ज्वारीची पुरी, बाजरी खजुरासाठी प्रथम, मलकापूर येथील कृषि सहाय्यक शीतल तायडे यांच्या बाजरी भाकरी व भरीतसाठी द्वितीय आणि मोताळा येथील कृषि पर्यवेक्षक अर्चना जोशी यांच्या ज्वारी बिबड्या, उपवासाचे भगर पापडसाठी तृतीय क्रमांक देण्यात आला.कार्यक्रमात आहारात पौष्टिक तृणधान्य उपयोगात आणण्याची शपथ दिली. यासाठी तंत्र अधिकारी अनंता झोडे, संजीवनी कणखर यांनी पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करून क्रीडा महोत्सवास सुरुवात करण्यात आली. यात कृषि सहाय्यक नितीन भंडारे, प्रियंका गवई, वरिष्ठ लिपिक गजानन पडोळ यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून पौष्टिक तृनधान्याचे विविध पदार्थ, आहारातील महत्व विषद करण्यात आले.
Users Today : 35