आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र सादर करावेत 31 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम मुदत

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि. 10 : शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी, औद्योगिक आस्थापना, अनुदानित, विना अनुदानीत शाळा, महाविद्यालये यांना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत ईआर 1 विवरणपत्र सादर करावे लागणार आहे.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाने विकसित केलेल्या mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगारविषयक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक, आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 नुसार सादर करावयाची आहे.माहे डिसेंबर 2022 अखेरचे त्रैमासिक ईआर-1 विवरणपत्र संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करून त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 जानेवारी 2023 आहे.सर्व आस्थापना, उद्योजकांनी विहित मुदतीत विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करावे, ऑनलाइन ईआर-1 विवरणपत्र सादर करण्यात अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *