ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्याला ध्वजदिन 2021च्या निधी संकलनासाठी दिलेले उद्दिष्ट 100 टक्के निधी संकलन करून पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याला 53 लाख 38 हजार रूपयांच्या निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.देशात 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी सशस्त्र सेनेचा ध्वज लावून सेनादलासाठी कार्य करणाऱ्यांच्या दृढ ऐक्याला नागरिक बळकटी लावतात. सशस्त्र सेना ध्वज निधीस समाज हातभार लावू आजी, माजी सैनिकांच्या प्रति ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पिले त्यांच्या प्रति नागरिक कृतज्ञता व्यक्त करतात.जिल्ह्याला ध्वजदिनाचे 53 लाख 38 हजार रूपयांच्या निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या नियोजन आणि प्रयत्नामुळे 100 टक्के निधी संकलित झाला आहे. निधी संकलन करून युद्धविधवा, माजी सैनिकांच्या कल्याणविषयक कार्यात मोलाचे सहकार्य केले आहे. दिलेल्या इष्टांकापेक्षा जास्त निधी गोळा केल्याबद्दल सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, तसेच जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.सीमांच्या रक्षणासाठी आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पिले आहेत, अशा कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीस सढळ हाताने मदत करून या राष्ट्रकार्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *