दहा दिवसांनी मुख्याधिकारी आले रिपब्लिकन सेनेने अनोखे स्वागत केले.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी चिखली .उमा सुरडकर :- दि.9 जानेवारी 2023 रोजी चिखली नगर पालिकेला प्रभारी नाही कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलाला पुष्पहाराचे साकडे!मागच्या आठवड्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने सी न्यूज चॅनल वर मुख्याधिकारी कार्यालयाला हजर राहत नसल्याने, नवीन घरकुल प्रकरण , आधार कार्ड मधील त्रुटी दुरुस्ती संबंधीत पत्रवार सही, एसिसमेंट काढ़ने, एन ए ऑर्डर वर सही करणे, चलान वर सही करणे अशी ईतर महत्त्वाची प्रकरणे मुख्याधिकारी हजर राहत नसल्याने रखडतात व त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल मुख्यालयी वेळ देण्याची मागणी केली होती. किमान दहा दिवसांच्या अंतराने आज मुख्याधिकारी साहेबांनी चिखली नगर पालिका कार्यालयाला भेट दिली असता रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी चिखली नगर पालिका कार्यालय गाठून मुख्याधिकारी सुरडकर साहेबांची भेट घेतली व मुख्याधिकारी साहेबांच्या दालनात गेले व या कार्यालयाला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा म्हणून त्यांच्या टेबलाला पुष्पहार घातले. चिखली नगर पालिका कर्मचारी हे मुख्याधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने व मुख्याधिकारी साहेबांचा येण्याच्या ठराविक दिवस वेळ नसल्याचा गैर फायदा घेत आहेत नागरिकांना नगर पालिका कर्मचारी व अधिकारी योग्य वेळेवर सेवा देत नाहीत , तसेच शहरातील नवे, जुने तहसिल कार्यालय परिसर, महात्मा फुले भाजी मार्केट, व ईतर ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले अश्या अनेक तक्रारी मुख्याधिकारी सुरडकर साहेबांच्या समोर मांडल्या असता त्यांनी सांगितले की मला दोन दोन नगर पालिकेचा कारभार सांभाळावा लागतो त्यामुळे मी वेळ देऊ शकत नाही.आपण जिल्हाधिकारी साहेबाकडे तक्रार करून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी करू शकता असे उत्तर देऊन अंग झटकून घेतले आहे.लवकरच रिपब्लिकन सेना जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन चिखली नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळवून देणार व नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतांना व त्यांच्या तेबलाला पुष्पहार घालतांना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, उपअध्यक्ष ब्रम्हाभाऊ साळवे, महासचिव सलीमभाई, पेंटर संघटना सुरेशभाऊ इंगळे, चिखली शहराध्यक्ष सुनिल सोळंके, तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, युवाशहर उपाध्यक्ष अप्पू खान, सौरभ बावस्कर, अनिल चव्हाण व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *