नायगाव देशमुख उपसरपंचपदी प्रल्हाद सुरडकर यांची निवड

Khozmaster
1 Min Read

तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत निवडणूक पैकी नायगांव देशमुख ग्रामपंचायत नऊ सदस्य संख्या पैकी आठ सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली पण वार्ड क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण पुरुष या सदस्य पदाच्या जागेसाठी निवडणूक झाली त्यामध्ये प्रल्हाद नारायण सुरडकर यांनी बहुमताने बाजी मारली, सहा डिसंबरला नवनिर्वाचित सरपंच यांच्या अधश्यातेखाली सचिव डी एस जवुळकर व निवडणूक निर्णय अधिकारी राठोड यांच्या उपस्थितीत उपसरपंच निवडणुक घेण्यात आली मध्ये प्रल्हाद नारायण सुरडकर व सौ रेखा गजानन तरास यांनी परस्पर विरोधी अर्ज दाखल केले होते पण या अटीतटीच्या निवडणुकी मध्ये सरपंच यांच्या एक मत व सदस्य यांचे पाच मते एकूण सहा मते आणि चार मते या फरकाने प्रल्हाद नारायण सुरडकर यांनी बहुमताने विजय मिळवला.नायगांव देशमुख ग्रामपंचायत उपसरपंच होण्याचा सलग दुसऱ्यांदा मान सुरडकर परिवाराला मिळाला आहे,या उपसरपंच निवडीचे श्रेय त्यांनी ग्रामपंचायत सदस्य सौ गीता विनोद डवंगे,सौ अन्नपूर्णा वासुदेव डोलारे,सौ विमल संजय ठाकरे,गजानन ढोले,समस्त सुरडकर परिवार,गावकरी मंडळी यांना दिले.

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *