मोठ्या नालीत फसलेल्या नंदीला दिले जिवनदान🚩🐄🌹

Khozmaster
1 Min Read

खामगांव :- गौ-सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशनच्या गौ-रक्षकांनी मोठ्या नालीत फसलेल्या नंदीला दिले जिवनदान सविस्तर माहिती अशी आहे की अग्रेसन चौक स्थित ओम लॉटरी सेंटरच्या बाजुला काल दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी नाली वरची फरशी वर तोल जाऊन ती तुटून एक बेवारस नंदी मोठ्या नाली मध्ये काल पासून अडकलेले होते नालीवर दुकान दारांचे फरशी कड्डप्पे व सिलाप होते त्यात नाली खोल अरुंद असल्यामुळे नंदीला काढणे खूप कठीण होते घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ-रक्षक सुरजभैय्या यादव, विजयभाऊ ठाकुर, लालु जोशी, पंकज देवगिरीकर, चंदु भाटिया, नगर परिषद कर्मचारी गणेश सुसगोहर, यांनी अथक परिश्रम घेऊन अखेर नंदीला काढण्यात यश आले या गौ-सेवेत अनंत निळे साहेब, राकेश शर्मा, शक्ती ठाकुर व काही नागरिकांनी आज दिनांक ९ जानेवारी रोजी इंडिया मेडीकल समोरील दुकानाच्या समोर नालीवरील कडप्पा फोडून नाली मधील फसलेल्या नंदीवर नियंत्रण मिळवून दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. अशी माहिती गौ-सेवक विजयभाऊ ठाकुर यांनी दिली.

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *