गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा :- नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामुळे शहरात रोगराई व डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, वार्ड क्रमांक 5 मध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले, डासांचे प्रमाण खूप वाढले, साहजिकच घराघरात आजार पसरण्याची भीती वाढू लागली हे लक्षात येताच वार्ड क्र 5 चे तरुण तडफदार नगरसेवक दीपक बोराडे यांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी रितेश बैरागी व आरोग्य व स्वच्छता विभागाचे रामेश्वर बोराडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उपक्रमास होकार दिला, आणि लगेच वार्ड क्र 5 मध्ये सलग दोन तास काळजीपूर्वक धूर फवारणी केली. त्यामुळे वार्डातील रोगजंतूंचा प्रादुर्भाव कमी होऊन आरोग्याला याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, शहरातील व वार्ड क्र 5 मधील आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मात्र नागरिकांनीही स्वच्छता व आरोग्य विषयी सतर्कता बाळगावी घरातील कचरा नियमित घंटागाडीत टाकावे, सांडपाणी कोणीही रस्त्यावर सोडू नये, नळ आल्यावर आपल्या नळाचे पाणी भरून झाल्यानंतर, नळाला तोटी लावून घेणे, जेणेकरून जागोजागी पाणी साठल्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढते व त्यामुळे डेंगू मलेरिया अशा आजारांचा ना सामोरे जावे लागते. त्यामुळे वॉर्डात धूर फवारणी करून घेतली आहे. घंटागाडी वार्डात नियमित न आल्यास, नळाला पाणी नियमित न सुटल्यास, नाली सफाई नियमित न झाल्यास व इलेक्ट्रिक पोलवरील लाईट बंद असल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन दीपक बोराडे यांनी जनतेला केलें, त्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले जात असून समाधान व्यक्त केले जात आहे, त्यापुढे दर पंधरा दिवसांनी अशाच प्रकारे फवारणी करून घेतली जाईल असे नगरसेवक दीपक बोराडे यांनी शेवटी सांगितले, या उपक्रमात स्वच्छता पर्यवेक्षक विलास काउतकर व नगरपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.