प्रकाश बापू सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मराठा-मराठी शेतकरी असे असंख्य सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाच वर्ष महाराष्ट्र राज्याची सत्ता राज ठाकरे साहेब यांच्या हातात द्या सगळे प्रश्न सुटून या सरकारच्या कार्यकाळातील सगळ्या कामांची इतिहासात नोंद होईल अशा प्रकारचे काम राज ठाकरे करतील, एक वेळा आपण विश्वास ठेवून बघायला हवा कारण यांच्या कडून जर काही झालेच नाही, तर राजकीय लोक काहीच करत नाहीत आणि हा शेवटचा पक्ष नेतृत्व असेल ज्यांना पूर्ण सत्ता दिल्या नंतर सुद्धा महाराष्ट्र राज्यासाठी काही केले नाही, म्हणून या नंतर कोणता ही मराठा मराठी शेतकरी माणूस राजकारण या वरती विश्वास ठेवणार नाही, म्हणून राज ठाकरे यांना एक वेळा संधी द्या.
कोण आहेत राज ठाकरे
1) जे काय आहे ते तोंडावर खरे बोलणारा नेता म्हणजे राज ठाकरे.
2) कधी ही शब्द न फिरवणारा नेता म्हणजे राज ठाकरे,
3) महाराष्ट्राकडे वाकड्या नजर बघितले तरी तळपायाची आग मस्तकाला गेल्यानंतर तो विषय आंदोलनाच्या माध्यमातून सोडवणारा नेता म्हणजे राज ठाकरे.
4) महाराष्ट्रातील मराठा-मराठी तरुण तरुणीला नोकऱ्या लागले पाहिजे म्हणून आंदोलन करणारा नेता म्हणजे राज ठाकरे.
5) समाजसेवक मराठा समाजाचे प्रामाणिकपणे विषय मांडून नेतृत्व करणारे मा.मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक होत आहे, हे लक्षात आल्या नंतर आंतरवाली सराटी मध्ये जाऊन जरांगे पाटील त्यांची भेट घेऊन यांच्या सोबत चर्चा करून त्यांच्या समोर जाहीर पणे सांगितले होते हे सरकार आरक्षण देणार नाही, जरांगे पाटील तुमची या महाराष्ट्राला गरज आहे, खरे बोलणारा नेता म्हणजे राज ठाकरे.
6) जसा मराठा समाज मा. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी विश्वास ठेवून ठामपणे उभा आहे, कारण पाटील सामाजिक प्रश्न आरक्षणाचा मुद्दा घेऊन आंदोलन आंदोलन करत आहे एक इंच ही मागे न हटणारा समाजसेवक म्हणजे मनोज जरांगे पाटील.
7) सामाजिक विषय आणि राजकीय विषयात ह्या दोन्ही बाजू एकच आहे म्हणून मा. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मराठी यांच्या भल्यासाठी राज ठाकरे यांना जाहीर पाठिंबा द्यायला हवा ही माझी वैयक्तिक भावना आहे.
8) मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांना पाच वर्षा साठी सत्ता दिल्या नंतर या महाराष्ट्र राज्यातील सगळ्या समाज घटकांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या हातात एक हाती सत्ता देऊन बघायला पाहिजे.
9) राज ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठा मराठी मुला-मुलींसाठी सामाजिक शेतकरी अशा असंख्य अनेक विषयावर आंदोलन केले म्हणून 100 पेक्षा अधिक खटले न्यायालयात चालू आहेत, आपल्याला ही गोष्ट हा नेता आवडत असेल आवडत नसेल तर आपल्या अंतरात्म्यासोबत निवांत चर्चा करून आपण निर्णय घ्यावा कारण 2024 विधानसभा निवडणूक हा पाच वर्षाचा कार्यकाळ इतिहासात नोंद होईल अशी या महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्न राज्याचा सर्वांगीण विकास होईल म्हणून आपण एक विचाराने राज ठाकरे यांना सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, आपल्या आपल्या विचाराच्या सगळ्याच कार्यकर्ते नेते यांना प्रश्न पडू शकतो आपण यांना कसा पाठिंबा द्यायचा सहाजिक प्रश्न उपस्थित होतो, आणि हे खरे सुद्धा आहे, परंतु हे बघायला पाहिजे कारण 2024 विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकी मध्ये राज ठाकरे यांच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे. अशी भावना व्यक्त प्रकाश सोळंके पाटील यांनी केले आहे.
Users Today : 22