बुलडाणा : प्रतिनिधी
बुलढाणा अर्बन गेल्या पंधरा वर्षापासून गरबा उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले नाही. परंतु यावर्षी “BCCN बुलढाणा अर्बन गरबा फेस्टिवल 2022 ” चे भव्य आयोजन करण्यात आले असून यावर्षी प्रथमच “मुली, महिला व कपल” करिता समितीने गरबा फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या गरबा फेस्टिवल समितीची निवड बुलढाणा अर्बन संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर माननीय डॉक्टर सुकेशजी झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सौ. कोमल सुकेशजी झंवर ,कार्याध्यक्षपदी एडवोकेट जितेंद्र उत्तमचंद कोठारी ,अनंताभाऊ केशव देशपांडे मार्गदर्शक तर उपाध्यक्षपदी सुधीर मनोहरराव भालेराव तसेच संजय गणपतराव कस्तुरे सचिव , दिनेश सखाराम आहेर सचिव, नरेंद्र शिवलाल शर्मा कोषाध्यक्ष ,मोरेश्वर बापूराव जोशी सदस्य ,कैलास जनार्दन मोरे सदस्य, मोहन रघुनाथ दलाल सदस्य ,गजानन विश्वनाथ चवरे सदस्य ,एडवोकेट चेतन जितेंद्र कोठारी सदस्य ,राजेंद्र श्यामराव वानेरे सदस्य, गजानन रुपराव रिंढे सदस्य ,अजय विजय कऱ्हाळे सदस्य ,पवन शेषराव सोनारे सदस्य, अनिल शेळके सदस्य ,राजेश उत्तमराव बगाडे सदस्य, अमोल पाटील सदस्य ,सुधाकर शिवाजी मानवतकर सदस्य, प्रेम सुधाकर आहेर सदस्य, निलेश सुरेशराव बनसोडकर सदस्य, राजेश सूर्यकुमार माधवानी सदस्य ,राहुल निवृत्ती चव्हाण सदस्य, राजू पंडितराव देशमुख सदस्य ,राजेंद्र देवचंद कायस्थ सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली आहे .
या समिती मार्फत गरबा फेस्टिवलचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. सदर मोफत प्रशिक्षण हे दिनांक 21 सप्टेंबर 2022 ते 25 सप्टेंबर 2022 पर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत तिरुपती मंगल कार्यालय, कारंजा चौक ,बुलढाणा येथील हॉलमध्ये दिल्या जाणार आहे. नवरात्री उत्सवामध्ये दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत दररोज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत गरबा फेस्टिवल चे आयोजन सहकार विद्या मंदिर च्या प्रांगणामध्ये चिखली रोड बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. गरबा फेस्टिवल मध्ये भव्य आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहे. सोबतच गरबा फेस्टिवल 2022 हे BCCN Live असणार आहे. गरबा उत्सवाच्या वेळेमध्ये पाऊस असला तर गरबा उत्साहाचे आयोजन सहकार विद्या मंदिर मधील “सहकार सांस्कृतिक भवन” च्या हॉलमध्ये करण्यात येईल. याची सर्व गरबा स्पर्धकांनी नोंद घ्यावी. अधिक माहिती व संपर्क करिता बुलढाणा अर्बन कंझ्युमर स्टोअर्स कारंजा चौक, बुलढाणा येथे तथा 9011023532/ 9011023605 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.