KRN Heat Exchanger IPO साठी गुंतवणूकदारांनी उघडली तिजोरी, ग्रे मार्केटमध्येही बोलबाला; पहिलीच दिवशी कुबेर पावणार

Khozmaster
2 Min Read

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील आयपीओ मार्केटचे वातावरण सध्या जोरदार तापले आहे. KRN हीट एक्सचेंजरच्या आयपीओने इतिहास रचला असून तीन दिवसांत आयपीओ एकूण २११ वेळा सबस्क्राइब झाला. KRN हीट एक्सचेंजर्स आणि रेफ्रिजरेशन कंपनी लिमिटेडच्या IPO कडून गुंतवणूकदारांना मजबूत परताव्याची अपेक्षा लक्षात घेऊन या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद
KRN हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशनच्या आयपीओसाठी अर्ज करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. तीन दिवसात २१२.२० कोटी रुपयांच्या एकूण सबस्क्रिप्शनसह आयपीओ बंद झाला असून आयपीओला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदार, संस्थात्मक, गैर-संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. KRN हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशनचा नवीन शेअर्स जारी करून आयपीओद्वारे ३४१.९५ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे.KRN हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशनच्या आयपीओमध्ये QIB पार्टमध्ये ३१,०७,४५५ समभाग राखीव होते ज्यासाठी ७८,६३,००,७१० शेअर्ससाठी अर्ज करण्यात आले तर या श्रेणीला एकूण २५३.०४ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. त्याचवेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव भागासाठी एकूण १,०२,२१,५९,८४० शेअर्ससाठी अर्ज करण्यात आले आणि हा हिस्सा ४२९.२६ वेळा सबस्क्राइब झाला तर किरकोळ गुंतवणूकदार वर्गाने एकूण ९४.९८ वेळा आयपीओ सबस्क्राइब केला.

मोठ्या AC कंपन्या ग्राहकांच्या यादीत
आयपीओमधून उभारलेल्या पैशातून कंपनी उपकंपनीमध्ये गुंतवणूक करेल आणि नीमराना, अलवर, राजस्थान येथे नवीन उत्पादन प्रकल्प उभारेल तर उर्वरित रक्कम कॉर्पोरेट कामासाठी वापरली जाईल. KRN हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशन एक फिन आणि ट्यूब-टाइप हीट एक्सचेंजरची आघाडीची उत्पादक कंपनी असून कंपनीच्या ग्राहकांमध्ये डायकिन, ब्लू स्टार, व्होल्टास आणि किर्लोस्कर चिलर्स या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच कंपनी आपली उत्पादने UAE, अमेरिका, इटली, सौदी अरेबिया, जर्मनी आणि नॉर्वे येथे निर्यात करते.

पहिल्याच दिवशी दमदार कमाईचे संकेत
KRN हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशन आयपीओला ग्रे मार्केटमध्ये भरपूर मागणी मिळताना दिसत असून या आयपीओचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये २७० रुपयांना उपलब्द आहेत. म्हणजे स्टॉक एक्स्चेंजवर KRN हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशनचे शेअर्स ४९० रुपयांना सूचीबद्ध होऊ शकतात जे आयपीओ किंमतीपेक्षा सुमारे १२३% हास्य आहे. अशाप्रकारे, आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप करण्यात आले त्यांना लॉटरीच लागेल.

0 6 7 4 3 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17:44