समर्थ कृषी महाविद्यालयात लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी साजरी

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ता. प्रतिनिधी देऊळगाव राजा  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा भारत देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री याच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले.         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतेमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला, प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व ते भारताचे पंतप्रधान असतानाचे त्यानी देशहितासाठी घेतलेले कणखर निर्णय तसेच त्यांची साधी राहणी व उच्च विचार व युद्ध काळात त्यानी जय जवान जय किसन दिलेला नारा याबद्दल सांगितले.    या कार्यक्रमास रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम काकड, प्रा मोहजीतसिंग राजपूत, प्रा. लिकेश मेश्राम, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी संकेत वाघ, ऋषिकेश मापारी, ऋतुजा मानकर , साक्षी काळे व इतर विद्यार्थी आणि कर्मकारी उपस्तीत होते

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *