तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे आपल्या लेखणीने आणि निर्भिड पत्रकारितेने समाज जागृती मोलिक कार्य करणारे लोकशाहीचे खरेखुरे आधारस्तंभ पत्रकार आहेत.असे प्रतिपादन गणेश सवडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आज दिनांक ६ जानेवारी रोजी सर्व पत्रकारांचा सत्कार केला आहे .त्यावेळी सर्व पत्रकारांना आणि कार्यक्रमात गणेश सवडे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. मुशीर खान कोटकर. सुषमाताई राऊत. सुरज गुप्ता. अर्पित मीनासे. संतोष खांडेभराड. कविश जिंतूरकर यांची उपस्थित होते. त्यावेळी पुढे बोलताना गणेश सवडे म्हणाले की पत्रकाराचा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे अनेक अडचणी येत असल्या तरीही पत्रकार आपल्या लेखणीतून समाज घडविण्याचे काम करत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्पित मीनासे यांनी केले. सूत्रसंचालन अरविंद खांडेभराड यांनी केले तसेच राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित तसेच पत्रकार उपस्थित होते
Users Today : 35