सतीश मवाळ मेहकर दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मानव अधिकार नवी दिल्ली या संघटनेचे विधिवत कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सचिव मा. गजानन इंगळे यांच्या शुभ हस्ते कार्यालय उद्धघाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय प्रमुख मा.अरुण पांडव, विदर्भ महिला अध्यक्षा मा.संगीताताई साबणकर, विदर्भ मीडिया प्रमुख मा.समाधान पदमने, विभागीय अध्यक्ष मा.विलास गुंगे, वर्धा जिल्हा अध्यक्ष मा. मंगेश राउत, अमरावती जिल्हा अध्यक्ष मा सविताताई अकोलकर,विदर्भ उपाध्यक्ष मा किरण ताई शेंडे, रोटकर ताई तसेच बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्षा मा राखीताई तिवारी यांची उपस्थिती लाभली.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.अकोला जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीकृष्ण पवार यांच्या अधिकारात अकोला जिल्हा येथे भव्य दिव्य असे कार्यालय स्थापना करण्यात आले.या संघटनेचे उदिष्ठ, समाजातील वंचित,पीडित मानवाला त्यांचे हक्क,त्यांचे अधिकार आणि त्यांना मदत, सहकार्य निःस्वार्थ पणे करून मानव सेवा देणे आहे सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी जोपासून दिन दुबळ्या मानवाला मदत करणे आणि सेवा देण्याचे कार्य करने. श्रीकृष्ण पवार साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हा स्तरीय नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करून त्यांना त्यांचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय सचिव, मा. इंगळे, राष्ट्रीय प्रमुख मा. पांडव, विदर्भ म.अध्यक्षा मा. साबणकर ताई, विदर्भ उपाध्यक्षा मा शेंडेताई, विदर्भ मीडिया प्रमुख मा.समाधान पदमने, विभागीय अध्यक्ष मा. गुंगे, अमरावती जिल्हाध्यक्षा मा.अकोलकर ताई, वर्धा जिल्हाध्यक्ष मा.राउत तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करून सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना सन्मानीय सत्कार करून पुढील निःस्वार्थ मानव हिताच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संचालक.अध्यक्ष मा गणेश डवरी साहेब,रा. उपाध्यक्ष सुहास सावर्डेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी पत्रकार दिनानिमित्त विदर्भ मीडिया प्रमुख पत्रकार समाधान पदमने यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. सविताताई अकोलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन किरण शेंडे यांनी मानले. तसेच श्रीकृष्ण पवार यांचे कौतुकास्पद कार्याबद्दल त्यांना शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सचिव इंगळे, पांडव, गुंगे, पदमने, पवार, अकोलकर,दुबे यांनी संघटने बद्दल व इतर इंंतभूत मार्गदर्शन केले. यावेळी अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.