मेहकर/प्रतिनिधी
महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या हाती पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल आणि खांद्यावर भगवा झेंडा दिला आहे. या भगव्याची शान राखाली जावी म्हणून सिद्धार्थ रामभाऊ खरात व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपल्या पायाला भिंगरी लावून घराघरात पोहोचत आहेत त्यांचे
कल्याणा, परिसरातील गावात
ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. माता-भगिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिले, फेरीमध्ये प्रचंड संख्येने सहभागी होत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. या वेळी मारुतीरायाचे आणि विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. घरोघरी जाऊन गावकऱ्यांना भेटी दिल्या, त्यांचे प्रश्न समजून घेतले.
परिवर्तन यात्रेमध्ये सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यांनी सिद्धार्थ रामभाऊ खरात यांना विधानसभेत पाठविण्यासाठी विश्वास दिला आणि यावेळी सगळे मिळून परिवर्तन घडवणारच अशी ग्वाही दिली
यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचे जेष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख, नगरसेवक, नगराध्यक्ष, शहरप्रमुख, शाखाप्रमुख तसेच इतर सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर युवासेनेचे सर्व पदाधिकारी, अल्पसंख्याक समाजाचे नेते, महिला विकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.