आमदार संजय रायमुलकरांनी फुलवला शेकडो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! पेनटाकळी कालव्याचा प्रश्न कायमचा मिटतोय ; आरसीसी ट्रफ प्रकारातील विदर्भातल्या पहिल्या प्रकल्पासाठी आणले ५८५ कोटी!

Khozmaster
5 Min Read

मेहकर : तारीख होती २१ जून २०२१ .. राज्यात महाविकास आघाडीचे
सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.त्यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.
संजय रायमुलकर हे सत्ताधारी पक्षाचाच भाग होते. मात्र असे असली तरी त्यांनी पेनटाकळी प्रकल्पात
तराफ्यावर बसून आंदोलन सुरू केले. अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या
आमदार रायमुलकर यांनी थेट पेनटाकळी धरणात उडी मारली. यावेळी एकच खळबळ उडाली.
तराफ्यावर असलेल्या काहींनी व पोलिसांनी पाण्यात उड्या घेत आमदार रायमुलकर यांना
पाण्याच्या बाहेर काढले. या घटनेची त्यावेळेला राज्यभर चर्चा झाली .. सत्तेत असताना देखील
आमदार रायमुलकर यांना उड़ी का मारावी लागली? या मथळ्याखाली तेव्हा राज्यभरातील प्रमुख
वर्तमानपत्रात बातम्याही छापून आल्या. मात्र या विषयाच्या खोलात शिरल्यानंतर सत्य माहिती समोर
आली. तेव्हा शेतकऱ्यांसाठी जीवाची, सत्तेची देखील पर्वा न करणाऱ्या आमदार रायमुलकराना
अनेकांनी सॅल्युट केला. रायमुलकरांची ती उडी ऐतिहासिक ठरली.आ. रायमुलकराच्या त्या
उडीमुळे, सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आता पेनटाकळी कालवाग्रस्त शेकडो शेतकऱ्यांच्या
चेहऱ्यावर आनंद फुलला आहे .. पेनटकाळी कालव्यातून पाणी पाझरत असल्याने ५ गावातील ४३२
हेक्टर वरील पिकांचे नुकसान होत होते.शेती पेरणी योग्य देखील उरली नव्हती. त्या शेतकऱ्यांना
तात्काळ मदत मिळावी आणि कालव्याची दुरुस्ती व्हावी यासाठी विद्यमान केंद्रीय मंत्री व तत्कालीन
खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रायमुलकरांनी केलेले प्रयत्न फळाला
आले आहेत. कालवाग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ५ कोटी ३७ लाख रुपयांची मदत जमा झाली असून
११ किलोमीटर कालवा दुरुस्तीसाठी तब्बल ५८५ कोटी रुपयांचा निधी आमदार रायमुलकर यांनी
मंजूर करून आणला आहे. विशेष म्हणजे हे कालव्याचे काम आर सी सी ट्रफ सिमेंटीकरण करून
होणार असून असे बांधकाम होणारा हा विदर्भातील पहिला प्रकल्प ठरला आहे.पेनटाक ळी
प्रकल्पाच्या कालव्यातून पहिल्यांदा २००३ साली पाणी सोडण्यात आलं होतं. १४ हजार ३०० हेक्टर या प्रकल्पाची सिंचन
क्षमता. २०२१ पर्यंत या कालव्यातून पाणी सोडण्यात येत होते. मात्र पाणी सोडल्यानंतर ते कालव्यातून पाझरत्यामुळे ५ किलोमीटर
परिसरातील जवळपास ४३२ हेक्टरवरील शेत जमिनीचे चिभलून मोठे नुकसान व्हायचे. रब्बी हंगामात होणाऱ्या या नुकसानामुळे
शेतकरी प्रचंड अडचणीत होते. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. कालव्याचे काम आरसीसी ट्रफ प्रकाराने व्हावे यासाठी १५
वर्षांपासून आमदार रायमुलकरांचा सभागृत्तात पाठपुरावा सुरू होता. २०१४ नंतर या कामाला थोडीफार गती मिळाली मात्र पुढच्या
काळात हा प्रकल्प आर्थिक नियोजनातूनती वगळण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाला आर्थिक नियोजनात आणण्यासाठीती आ.
रायमुलकर यांना प्रचंड पाठपुरावा करावा लागला. दरम्यान १६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता रब्बी हंगामाकरीता
कालव्यातून पाणी सोडण्यात आले, त्यावेळी कालवा पाझरून पेनटाकळी, दुधा, ब्रह्मपुरी, रायपुर, पाचला या गावातील शेतकऱ्यांचे
मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून या कालण्यातून पाणी सोडण्यात येत नव्हते …

                                                        अधिकाऱ्यांना धारेवर धरले…..
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने तातडीने मदत द्यावी यासाठी आमदार रायमुलकर सातत्याने पाठपुरावा करत होते.
मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या या काळात तत्कालीन सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले. सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने
अधिकारीही केवळ चालढकल करत होते. म्हणून आ. रायमुलकर यांना आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला. धरणात उडी मारून
आंदोलन केल्यानंतर मात्र राज्य सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर हा विषय मार्गी लागण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा …

एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर आ. रायमुलकर यांना या मुद्द्यावर पाठपुरावा करण्यासाठी
भक्कम पाठबळ मिळाले. संजय रायमुलकर यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केला.
संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील प्रतिसाद देत तात्काळ संबंधित विभागाला आदेश दिले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली
साडेपाच कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. मुख्यमंत्री शिंदे
आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून ११ किलोमीटर अंतराचे हे आर सी सी ट्रफ सिमेंटीकरणाचे ५८५ कोटींचे
काम मंजूर झाले. पहिल्या टप्प्याच्या ९४ कोटींच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर, सावत्रा, पाचला,
मोसंबी वाडी, मिस्कीन वाडी, जानेफळ, उटी, गोमेधर, लोणीकाळे, वरवंड, घाटनांद्रा या गावातील शेतकऱ्यांना कालवा दुरुस्तीचे
काम पूर्ण झाल्यानंतर या कालव्याचा अधिक चांगला फायदा होऊन शेती बारमाही ओलिताखाली येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून
बंद असलेल्या कालव्यातून आता पुन्हा पाणी खळाळणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलारून आला आहे.
पेनटाकळी प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी दोन ठिकाणी याबद्दल आमदार संजय रायमुलकर यांचा यापूर्वीच सत्कार
केला आहे. अर्थात शेतकऱ्यांचे आशीर्वाद आ. रायमुलकर यांना आता मिळणार आहेतच …

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *