आज बहूजन वंचित आघाडीच्या डॉ ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारार्थ ॲड प्रकाश आंबेडकर यांची मेहकर येथे जाहीर सभा…..

Khozmaster
2 Min Read
मेहकर:-(सुमित खंडारे)
मेहकर लोणार विधानसभा निवडणुकीतील बहुजन वंचित आघाडी,क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ. ऋतुजा ऋषांक
चव्हाण यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माजी खासदार ॲड प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मेहकर येथील यशवंत मैदान
नगरपरिषद येथे दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात
आली आहे. या सभेला मतदारसंघातील मतदारांनी प्रचंड संख्येने उपस्थित
राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.सौ. ऋतुजा चव्हाण यांनी केले आहे.मेहकर लोणार मतदार संघ हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सर्व ताकदीनिशी विधानसभेच्या मैदानात उडी घेतली आहे.
मतदारसंघातील नागरिकांचाही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उच्चशिक्षित व्यक्तिमत्व डॉ.सौ.ऋतुजा ऋंषाक चव्हाण यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गावागावात त्यांना नागरिकांकडून पाठिंबा जाहीर केला जात असून
मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला सर्वच स्तरावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर मेहकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड
मतांनी विजयी करुन मेहकर विधानसभा निवडणुकीत एक इतिहास घडवावा,यासाठी वंचितचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश
उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची आज सोमवारी सकाळी १० वाजता मेहकर येथील यशवंत मैदान येथे भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात
आली आहे.तरी या सभेला मतदारांनी आवर्जून उपस्थित राहाण्याचे आवाहन बहूजन वंचित आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ ऋतुजा ऋषांक चव्हाण तसेच क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते डॉ ज्ञानेश्वर टाले यांनी केले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन
करण्यात येणार आहे.वंचित बहुजन आघाडीला मिळत असलेला पाठिंब्याने
विरोधकांचे धाबे दणाणले असून या सभेत ॲड प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *