किती चहाटळ थंडी
थंडी थंडीला लाजते।।धृ।।
बरं का आवाज नाही
खरं का वाजत नाही
अशी चहाटळ थंडी
थंडी अंगाला झोंबते।।१।।
हिमालयी बर्फ गोरी
वारा रुपी आली छोरी
अशी उजागर थंडी
शरीराला मानवते ।।२।।
खावे डिंक लाडू किती
तीळ गुळ लाडू किती
अशी खावाड ही थंडी
थंडी अंगी ही लागते।।३।।
भिंग घेऊन ती पहा
कान देऊन ती पहा
अशी लाजरी ही थंडी
थंडी बुजरी सजते।।४।।
कुणा बारबापी थंडी
कुणा मायबाप थंडी
अशी हवी हवी थंडी
थंडी गावाला वाजते।।५।।
कवी:-द.रा.गोसावी.
Users Today : 0