बुलढाणा
निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय निष्पक्षता आणि समान शिष्टाचार पाळला जात नसल्याचा गंभीर आरोप बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सपना सुबोधभाऊ सावजी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सावजी यांनी आपल्या पत्रात दोन वेगवेगळ्या प्रसंगांचा दाखला देत निवडणूक अधिकाऱ्यांच्या वागणुकीतील विसंगती अधोरेखित केली आहे.
पहिल्या प्रसंगात उमेदवार Zeeshan Siddique यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारताना निवडणूक निर्णय अधिकारी उभे राहून सन्मानाने अर्ज स्वीकारताना दिसत आहेत. यावेळी खासदार Sunil Tatkare उपस्थित होते.
तर दुसऱ्या प्रसंगात, राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis स्वतः उपस्थित असताना माजी आमदार प्रमोद जठार यांचा अर्ज स्वीकारताना तेच अधिकारी खुर्चीत बसून प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या दोन भिन्न वागणुकीमुळे प्रशासनाच्या तटस्थतेबाबत प्रश्न निर्माण होत असून हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक केलेला दुजाभाव, असा टोकदार सवाल सावजी यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रक्रियेत शिष्टाचाराचे नियम सर्वांसाठी समान नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
“प्रशासन खरोखरच निष्पक्ष आहे का, की राजकीय परिस्थितीनुसार वर्तन बदलते? अशा प्रकारच्या पक्षपाती वागणुकीमुळे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर परिणाम होतो,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सामान्य नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शैलेश सावजी यांनी केली आहे.
Users Today : 22