वाळू तस्कर आणी कर्मचाऱ्यांच्या संगणमताने प्रशासनाची दिशाभूल) गजानन माळकर तालुका प्रतिनिधि मंठा:-मंठा: तालुक्यातील देवठाणा उस्वद शिवारातील गट नं ५६१ मधील जप्त केलेल्या दिडशे ब्रास वाळू साठ्याचे लिलाव दिं १९-१२-२०२२ रोजी तहसिल कार्यालयात करण्यात आल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले व दिं २२ डिसेंबर रोजी लिलावधारकाला दिडशे ब्रास वाळू साठा उचलण्याठी २० दिवसाची मुद्दत देण्यात आली होती.माञ २० दिवस पुर्ण होत आले असतांना सूध्दा लिलाव झालेल्या ठिकाणी आज रोजी ४०० ते ५०० ब्रास शिल्लक वाळूचा मोठा ढिगार आला कुठून?
लिलाव झालेला वाळू साठा दिडशे ब्रासच होता का?जर लिलाव झालेला वाळू साठा दिडशे ब्रासच होता तर नियमाने दिडशे ब्रास वाळू उपसा होवूनही आज रोजी तेथे पडून असलेला शेकडो ब्रास शिल्लक वाळूचा साठा कुठून आला? का? महसूल विभागाने शासनाची दिशा भूल करत हजारो ब्रास वाळू साठ्याचे लिलाव दिडशे ब्रास मध्येच तर केले नाही ना? केले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो .दिडशे ब्रास वाळूचे टेंडर काढून शेकडो ब्रास वाळू उपसा….वाळू तस्कर आणी कर्मचाऱ्यांच्या संगणमताने दिडशे ब्रासचे टेंडर असतांना शेकडो ब्रास वाळू उपसा होत असल्याने शासनाच्या महसूलाला लागत आहे लाखोचा चूना !एक हजार ब्रास वाळूचा घोटाळा….देवठाणा उस्वद शिवारातील गट नं ५६१ मध्ये झालेल्या दिडशे ब्रास वाळच्या लिलावात महसुल विभागाने शासनाची दिशाभूल करत हजारो ब्रास वाळू साठ्याची वाळू तस्करा सोबत संगणमत करून दिडशे ब्रासचाच अधिकृत लिलाव, म्हणजे एक हजार ब्रास वाळूचा घोटाळा झाल्याचा संशय !तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होवू शकला नाही.सखोल चौकशीची गरज..वाळू तस्कर व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने नियमापेशा जास्त वाळू उपसा होत असून शासनाचा लाखोचा महसूल बूढत आहे व अजून ही शेकडो ब्रास वाळूचे ढिगार देवठाणा उस्वद शिवारातील गट नं ५६१ मध्ये पडून असल्याने या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीची गरज.