सखी वन स्टॉप सेंटर येथे जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

KHOZ MASTER
1 Min Read

बुलडाणा, दि. १३ : येथील सखी वन स्टॉप सेंटर येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी, कृषी समृद्धी मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र सोभागे, आशा शिरसाट, वन स्टॉप सेंटरच्या कर्मचारी आशाताई बोर्डे, केस वर्कर ज्योती आढावे, प्रतिभा भुतेकर, श्वेता जाधव, उमेश निकाळे, आरती गायकवाड उपस्थित होते.श्री. मारवाडी यांनी सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. त्यांनी वन स्टॉप सेंटरच्या निवारा केंद्राचे कौतुक केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून जिजाऊंचा वारसा जपल्या जात असल्याचे सांगितले. जिल्हा महिला बाल विकास कार्यालयातर्फे विविध योजना चालवल्या जातात. याचा लाभ निराधार पीडित महिलांना देण्यात देईल. तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीने पोलीस मदत, आपत्कालीन मदत, कायदेविषयक मदत, सल्ला व समुपदेशन, तसेच निवारा व वैद्यकीय सेवा दिल्या जातात, त्याचा प्रसार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *