गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा,: तालुक्यातील देवठाणा उस्वद शिवारातील गट नं ५६१ मध्ये झालेल्या त्या दिडशे ब्रास वाळू साठ्याच्या लिलावाच्या ठिकाणी लिलावधारकाला वाळू उचलण्याठी दिलेला कालावधी संपवून ही तेथे शेकडो ब्रास वाळूचा साठा पडून असल्याची बातमी काल ( ता.१३ ) रोजी दै लोकसंर्क मध्ये प्रकाशीत केली.व आमच्या प्रतिनिधिने त्या ठिकाचे फोटो व व्हिडिओ सहित पुर्ण माहिती संबंधित अधिकारी व प्रशासनास कळवली पण महसूल विभागाने पंचनामा करून कारवाई करण्या ऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्याने एक प्रकारे वाळू माफियांना सुगीचे दिवस आल्याचे म्हणने वावगे ठरणार नाही.देवठाणा उस्वद शिवारातील त्या लिलाव झालेल्या ठिकाणी दिडशे ब्रास जप्त वाळू साठ्याचे लिलाव हे १९ डिसेंबर रोजी झाले व २२ डिसेंबर पासून लिलाव झालेला वाळू साठा उचलण्याठी लिलावधारकाच्या ताब्यात दिले असले तरी १२ जानेवारी पर्यंत म्हणजे २०दिवसाचा कालावधी संपवून ही त्या ठिकाणी शिल्लक वाळूचे मोठ मोठे ढिगार पडून असल्याचे दिसून आले .वाळू तस्कर व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने प्रशासनाची दिशाभूल करत हजारो ब्रास वाळू साठ्याचा केवळ दिडशे ब्रास मध्ये लिलाव झाल्याने शासनाच्या महसूलला लाखोचा चूना लागत आहे.महसूल विभागाने त्या देवठाणा उस्वद शिवारातील लिलाव झालेल्या ठिकाणी शिल्लक वाळू साठ्यावर कोणतीच कारवाई न केल्याने आज रोजी सुध्दा वाळूची वाहतूक चालू असल्याने या परीसरातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची वाळू माफियाशी मिलिभगत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये होत आहे.यामुळेच या परीसरात वाळू माफियाचा बोलबाला असल्याचे चित्र आहे.त्या शेकडो ब्रास शिल्लक वाळू साठ्याकडे…..देवठाणा उस्वद शिवारातील लिलाव झालेल्या त्या दिडशे ब्रास वाळू साठ्याच्या ठिकाणी शिल्लक असलेल्या अवैध शेकडो ब्रास वाळू साठ्याकडे महसूलचा कानाडोळा !तहसीलदार यांना कालच कळविले असून ते आज पंचनामा करतील – जाधव साहेब, उपविभागीय अधिकारी परतूर लिलावधारकाला दिलेल्या कालावधीचा उद्द्याचा एक दिवस बाकी राहिल्याने उद्द्याच पंचनामा करणार – कैलाशचंद्र वाघमारे, तहसीलदार मंठा
Users Today : 22