विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ, गुन्हा दाखल

KHOZ MASTER
1 Min Read

नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : विद्यार्थिनीला हातवारे करून अश्लील शिवीगाळ करण्याऱ्या तरुणा विरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत १८ वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सुमित दीपक मोहणानी रा. नांदुरा हा गेल्या महिनाभरापासून माझ्या मागे येऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. १० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान मी माझ्या चुलत बहिणीसह कॉलेज संपून घरी ग्राम भुईशेंगा येथे जात असताना नगरपरिषद तुला जवळ आरोपी सुमितने माझ्यामागे येऊन अश्लील हावभाव केले. यावेळी माझ्या बहिणीने त्याला म्हटले की तुला आई-बहीण नाही का तेव्हा त्याने आम्हाला अश्लील शिवीगाळ केली.डोळा मारला. या तक्रारीवरून आरोपी सुमित मोहनानी आणि विरुद्ध कलम 509,294 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *