पैनगंगा नदी स्वच्छता मोहिमेला कोलवडातून सुरवात

KHOZ MASTER
2 Min Read

जिल्हाथिकारी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान चिखली, मेहकर तालुक्यात नदीकाठच्या गावात श्रमदान बुलडाणा, दि. १४ : ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात प्रशासनाने पुढाकार घेत श्रमदान करून आज बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे पैनगंगा नदी स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या उपस्थितीत नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, निवडणूक उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, तहसिलदार शामला खोत, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत पाटील, ग्राम विकास अधिकारी गणेश पायघन, गजानन मोतेकर आदी उपस्थित होते.श्रमदानातून पैनगंगा नदी स्वच्छता अभियानास आजपासून सुरुवात करण्यात आली. माथा ते पायथा हा उपक्रम अतिशय गांभीर्याने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. पैनगंगा नदी काठावरील प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियान आणि श्रमदान अभियान अत्यंत उत्साहामध्ये पार पडले. या अभियानामध्ये जिल्हा प्रशासनासोबतच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यानी श्रमदानात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.‘चला जाणूया नदीला’ उपक्रमातून पैनगंगा नदीचे 84 किलोमीटर पात्र श्रमदानातून स्वच्छ करण्यात येणार आहे. कोलवड येथे तहसिल कार्यालय, ग्राम पंचायत कोलवड, विद्या विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.बुलडाणा तालुक्यात गिर्डा, चौथा, सव, मढ, खूपगाव, तर चिखली तालुक्यात दिवठाणा, पेठ, ब्रम्हपुरी, सवना, बोरगाव काकडे, किन्होळा येथे श्रमदान करण्यात आले. कोलारी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रभातफेरी काढली. पेठ येथे नदीचे पूजन करून स्वच्छता करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *