अबलवृद्धांना खुणावतेय व्यंकटगिरीवरील स्वप्ननगरी अ­ॅम्युझमेंट पार्क!

Khozmaster
3 Min Read

महाराष्ट्रात कुठेच नसलेले डायनोसोर विशेष आकर्षण, विविध फन राईड आणि ७ डी थीएटरचाही अनुभव बुलढाणा, दि. १० (प्रतिनिधी) येथील राजूर घाटातील व्यंकटगिरीवर प्रति तिरूपति बालाजी मंदीराच्या रुपात बुलडाण्यात आध्यात्मिक आणि धार्मिक इतिहास रचला गेला आहे. आता याच व्यंकटगिरीवर आबालवृद्धांच्या निखळ मनोरंजनासाठी जागतिक दर्जाचे अ­ॅम्युझमेंट पार्क साकारण्यात आले आहे. ११ एकराच्या विस्तीर्ण जागेत आधुनिक साधनांसह उभी राहिलेली ही स्वप्न नगरी लहान मुलांनाच नव्हे तर अबालवृद्धांना आकर्षीत करत आहे. श्रीनिवास एंटरटेन्मेंट व श्री बालाजी सेवा समितीद्वारे स्वप्ननगरी अ­ॅम्युझमेंट पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून ही स्वप्ननगरी सर्वांसाठी खुली झाली आहे. महाराष्ट्रात कुठेच नसलेले महाकाय डायनॉसोर या अ­ॅम्युझमेंट पार्कमध्ये पहायला मिळतात. विशेष म्हणजे विविध प्रजातीचे हे वेगवेगळे डायनॉसोर असून त्यांची सविस्तर माहितीही या ठिकाणी मिळते. जमिनीपासून चार मीटर उंचीवर असलेली मोनोरेल संपूर्ण ११ एकराला वेढा मारून राजूर घाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडविते. या मोनोरेलमध्ये बसलेले प्रवासी पसरलेले जंगल, घाटातील नागमोडी रस्ते, पार्कचे विहंगम दृष्य बघून थक्क होवून जातात. क्लाऊझर हा प्रकारही चित्त प्रसन्न करणारा आहे. खाली-वर हालचाल करणाऱ्­या घोड्यांच्या पुतळ्यांवरून वर्तुळाकार सफर म्हणजे क्लाऊझर आहे. लहान मुलांसाठीची बेबी ट्रेन देखील आहे. तसेच सन अ­ॅण्ड मून चा झूला मुलांना आकाशात नेवून पुन्हा जमिनीवर आणतो. हा थरारक खेळ वेगळाच आनंद देतो. तर फिरणारी ‘कप-बशी’ सर्वांगाला गदगद हलविते. या अम्युझमेंट पार्कचे प्रमुख आकर्षण म्हणजे डायनो पार्क. हाँगकाँग येथून अत्याधुनिक तंत्रज्ञानासह विकसीत करण्यात आलेले विविध प्रकारचे डायनासोर डायनोपार्कमध्ये आहेत. डायनासोरच्या या वेगवेगळ्या प्रतिकृतींना वेगवगळ्या प्रकारच्या आवाजांनी तंत्रशुद्धपणे उभे करण्यात आलेले आहे. डायनासोरच्या जवळ गेल्यानंतर तो जीवंत असल्यासारखा हालचाल करतो, आवाज करतो आणि डोळेही लपकवतो. याचठिकाणी डायनो राईडसुद्धा आहेत. ही स्वप्ननगरी पाहण्यासाठी आता महाराष्ट्रातून पर्यटक येत आहे. विविध शाळा, महाविद्यालयांच्या सहली येथे येऊन एक वेगळाच अनुभव गाठीशी बांधून जात आहेत. दोन वर्षांच्या बाळापासून ते ९० वर्षाच्या वृद्धांपर्यत सर्वांसाठी ही स्वप्ननगरी खुली असून सर्वांसाठी विशेष सुविधा येथे आहेत. सध्याच्या थंडीच्या दिवसांतही येथे पर्यटक व अबालवृद्धांचा वाढता ओघ या स्वप्ननगरीचे वेगळेपण सिद्ध करणारा आहे. विशेष म्हणजे भगवान बालाजींच्या मंदिर परीसरातच ही स्वप्ननगरी आहे. प्रवेशद्वारावरील प्रचंड उंचीची हनुमान मूर्ती लक्षवेधी आहे. येथे एक मिनी सिनेमागृह असून त्यामध्ये महिमा भगवान बालाजीचा हा चित्रपट देखील दाखविण्यात येतो. या अ­ॅम्युझमेंट पार्कला सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहन स्वप्ननगरी परिवार आणि श्री बालाजी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *