लोणार पंचायत समिती अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची मराठी भाषा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत स्थानिक शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दि…..रोजी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कवी /लेखक व महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ विशाल इंगोले हे होते. तर अध्यक्ष म्हणून श्री परिहार सर (उपाप्रचार्य शि. हा. व क महाविद्यालय), व प्रमुख उपस्थितीत विठ्ठल घारोड सर आणि विशेष उपस्थितीत श्री एल. डी. चव्हाण गट शिक्षण अधिकारी पं. स. लोणार हे होते यावेळी बोलतांना डॉ विशाल इंगोले यांनी मराठी भाषेचा उगम आणि तिची बदलत गेलेली रूपे तसेच वेगवेगळ्या बोलीभाषा हे जपण्याचे काम खऱ्या अर्थाने व्हायला हवे. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनसाठी व तिला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी नुसते पंधरवाडे नाही तर कायम आपन जपली पाहिजे. भाषेवर होणारे इंग्रजी भाषेचे आक्रमण आपल्यापासुन सुरुवात करुन रोखले पाहिजे. आपल्या भाषेचा वापर आणि आदर आपण ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली भाषा संवर्धित व वृद्धिंगत होनार नाही. इंग्रजी शाळेचे पेव फुटले असतांना आता ही जबाबदारी आणखी वाढली आहे असेही मत त्यांनी नमूद केले.यावेळी मराठी भाषेचे अध्यापन करणारे सर्व शिक्षक व शिक्षिका हजर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. के. डव्हळे सर,यांनी तर संचालन शिवदास वराडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बी.एस.कायंदे,श्री व्हि. एस. गरकळ, श्री व्हि. बी. पेटकर विषय साधन व्यक्ती यांनी विशेष प्रयत्न केले.
