गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा,शहरासह तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ- जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी मंठा: तालुक्यातील देवठाणा उस्वद शिवारातील गट नं ५६१ मधील जप्त केलेल्या हजारो ब्रास वाळू साठ्याच वाळू तस्कर व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने प्रशासनाची दिशाभूल करत केवळ दिडशे ब्रास वाळू साठ्याचे नियमाप्रमाणे लिलाव झाले. पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजारो ब्रास वाळू साठ्याचे मोठ मोठे ढिगार शिल्लक होते.व लिलावधारकाला दिलेला कालावधी ही संपला पण त्यावर मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल विभागाने लक्ष देवून कोणतीच कारवाई न केल्याने शासनाचा लाखोचा महसूल पाण्यात गेला आहे. शनिवार रोजी त्या हजारो ब्रास शिल्लक वाळू साठ्यातून वाळू माफियांनी दिवसा ढवळ्या ग्रामीण भागात व मंठा शहरात राजरोसपणे वाळूची वाहतूक केली.माञ महसूल विभागाने कूंभकर्णाच्या झोपेचा सोंग घेतल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये संताप व्याक्त होत आहे.मंठा शहरातून दिवसा ढवळ्या वाळूचे मोठ मोठे हायवा कोणती ही भीती न बाळगता राजरोसपणे वाहतूक करत होते .यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने अवैध गौणखनिज उपसा व वाहतूकिला हप्ताखोरीचे अभय असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये होत आहे.मंठा तालुक्यात वाळू माफियांनी धूमाकूळ घालत एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गौणखनिजाची राजरोसपणे वाहतूक चालू असतांना माञ अवैध गौणखनिज तपासणी भरारी पथकाने कूंभकर्णाची झोप घेतल्याने अवैध गौणखनिज तपासणी भरारी पथक दाखवा व बक्षिश मिळवा अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगल्याची चर्चा आहे. अनेकदा बातम्या लावून ही महसूल विभाग दुलर्क्ष करत असल्याने शासकीय महसूल विभाग कि वसूली विभाग आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तालुक्यात अवैध गौणखनिज उपसा व वाहतूक राजरोसपणे चालू असल्याने जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.तालुक्यात ज्या भागातील बातमी लागतील त्या भागातील मंडळ अधिकारी, तलाठी, अवैध गौणखनिज उपशाला जबाबदार ठरविला जातो.परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या मंडळींना बगल मिळत असल्याने नागरिक समभ्रमात आहे.
Users Today : 22