राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त टायगर ग्रुप बुलढाणा जिह्यातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

KHOZ MASTER
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे..प्रतिनिधी सिंदखेड राजा टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल राठोड यांच्या नेतृत्वाखाली टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हयातर्फे सिंदखेड राजा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सध्या आपल्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा प्रचंड प्रमाणात भासत आहे ,हे लक्षात घेता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.. यावेळी टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल राठोड ,सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पवन मेहेत्रे ,टायगर ग्रुप देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष योगेश पवार,तालुका उपाध्यक्ष विकास राठोड संजय जायभाये,सचिन भुतेकर,प्रताप गवई,वैभव लोढे ,अमोल हिवाळे,वैभव भुतेकर,शुभम चौधरी ,शिव खंडागळे ,जालना रक्त केंद्र जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कटोरे आणि सहकारी व टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते..

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *