गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा,प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग खराब झाल्यामुळे शक्तीने टोल वसुली करू नये म्हणून दि,१८/१/२०२३. रोजी श्रीमान राज साहेब ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर परळी येथे येणार आहेत, या राष्ट्रीय महामार्गाच्या गंभीर विषयावर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मा राज साहेब ठाकरे यांच्या सोबत चर्चा करणार आहेत असे हि श्री सोळंके यांनी सांगितले, तसेच जिल्हाधिकारी जालना यांच्यामार्फत निवेदन देऊन निवेदनात पुढे म्हटले आहे,मा.नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत सरकार यांचे काम अप्रतिम आहे परंतु त्यांच्या आसऱ्याखाली काही लोक पैसा कमावण्याच्या उद्देशाने देशाचे हित ना लक्षात घेता पैसा कमावण्याचा एकमेव दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बोगस काम करीत आहेत, म्हणून खामगाव ते पंढरपूर महाराष्ट्र राज्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या रस्त्यावरून दळणवळण करणाऱ्या लोकांकडून टोल वसुली करता येणार नाही, काम चोराला धाम चोर भेटतो, रस्त्याचे काम बरोबर झाले नाही म्हणून टोल वसुली करता येणार नाही, मा.नितीनजी गडकरी यांच्याकडे या राष्ट्रीय महामार्गाचे काम बरोबर झाले नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी जालना यांचा सोबत चर्चा करून त्यांच्यामार्फत निवेदन देऊन दि.११/१/२०२३ रोजी तक्रार करण्यात आलेली आहे, तक्रारीत मागणी केलेली आहे या राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित गुत्तेदारांकडून नव्याने काम करून घेतले पाहिजे मा.नितीनजी गडकरी रस्ते विकास व वाहतूक केंद्रीय मंत्री झाल्यापासून अनेक मोठमोठे रस्ते झाले जवळपास ९८ टक्के रस्त्याचे कामे उत्तम दर्जाचे झाले आहेत परंतु शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या महामार्गाचे काम ५० टक्के बोगस झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम दंडात्मक कारवाई करून नव्याने करून घेतले पाहिजे तरच येणाऱ्या पिढ्याला खड्ड्यात पडून मरायची वेळ येणार नाही, शेगाव ते पंढरपूर या रस्त्यावर टोल वसुली करू नये ही जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली वास्तव भूमिका आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्राला शिकवलेले आहे देशासह महाराष्ट्रत रयतेचे राज्य असले पाहिजे,म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे काम खराब झाल्यामुळे व या राष्ट्रीय महामार्गाचे काम कागदोपत्री व्यवस्थित करणाऱ्या लोकांवर राज्य सरकारने व केंद्र सरकारने खटले दाखल करून कारवाई केली पाहिजे कारवाई झाली तर अशा प्रकारचे बोगस कामे होण्यास आळा बसेल,मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे नेहमी सांगत असतात ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी लाथ बसलीच पाहिजे, म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या महामार्गावर टोल वसुली करू नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र विनंती आहे या राष्ट्रीय महामार्ग केंद्र व राज्य सरकार टोल रद्द करून कारवाई करील हे अपेक्षा आहे.. उत्तर भारत महाराष्ट्र राज्यातून दक्षिण भारताला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या राष्ट्रीय महामार्गाचे काम बरोबर न झाल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेऊन टोल वसुली करू नये याबाबत कारवाई करण्यात यावी असे मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा. मुख्यमंत्री एकनाथ संभाजीराव शिंदे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडवणीस यांना माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्यामार्फत निवेदन देऊन तक्रार करण्यात आली तक्रारी शेवटी असा इशाराही मनसेच्या वतीने या राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस झाल्यामुळे जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही भूमिका घ्यावा लागत आहे दिला आहे या राष्ट्रीय महामार्गावर शक्तीने टोल वसुली केली तर विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मार्गावरील प्रत्येक शहर गाव तांडे वस्ती वाड्या या भागातील जनता रस्त्यावर येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे, तसेच मा.नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत सरकार, मा.अमितजी शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार मा.नितीनजी गडकरी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री भारत सरकार यांना माहितीस्तव तक्रार सादर करण्यात आली असेही पत्रात नमूद केलेले आहे.
Users Today : 22