मंठा बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश स्थगित

Khozmaster
1 Min Read
गजानन माळकर,तालुका प्रतिनिधी 
मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीच्या पणन संचालक (पुणे) यांच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी स्थगिती दिली. मंठा बाजार समितीचे सभापती संदीप गोरे यांनी अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत ही याचिका
दाखल केली आहे. याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होईल. मंठा बाजार समितीची मुदत २८ सप्टेंबर २०१२ रोजी संपुष्टात आल्यानंतर संचालक मंडळाला एक वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव बाजार समितीने शासनाकडे पाठविला होता. प्रस्ताव प्रलंबित असताना गोरे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *