मूर्तिजापूर येथील माळीपुरा जुनी वस्ती देवरण रोड जाणाऱ्या मार्गावरील गणेश टाक यांच्या घरापासून ते किशोर ढोले यांच्या दुकानापर्यंत दोन हाय टेन्शन विजेचे पोल आहे ते पोल काही दूर घ्यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे सहाय्यक अभियंता विद्युत कार्यालय जोगी साहेब यांच्याकडे स्वप्निल गजाननराव गणगणे यांनी केली आहे
तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी करंट लागण्याच्या अशा दुर्दैव घटना घडल्या आहेत तरीही विद्युत विभागाने जागरूक होणे गरजेचे आहे..!
माळीपुरा जुनी वस्ती देवरन रोड येथे श्री गणेश टाक यांच्या घरापासून ते श्री किशोर ढोले यांच्या दुकानापर्यंत समोरून हाय टेन्शन चे विजेचे तार गेले आहे घरात लहान लेकरं पण आहे त्या कारण नेहमी भीती निर्माण होते की काही अपघात ना घडाव तरी आपल्याला नम्र निवेदन आहे की आपण हाय टेन्शन विजेच्या ताराचा एक पोल चांडक यांच्या घरासमोर व दुसरा पोल आमच्या घरासमोर आहेत तरीही हे दोन पोल काही दूर लावावे जेणेकरून भविष्यात काही अपघात घडल्यापासून वाचवू शकेल असे निवेदनात आहे
तरीही विद्युत विभागाने याची काळजी घेऊन तात्काळ तिथल्या रहिवासीयांच्या समस्याच समाधान करणे अतिशय गरजेचे आहे तरीही तिथल्या रहिवाशी यांना हाय टेन्शन विजेचे तार खूप धोकादायक असल्याचे दिसून येते आहे
या निवेदनावर नितीन टवलारे, संतोष भाले, किशोर ढोले, अशु भेले, अमोल टाक, विशाल क्षीरसागर, अमोल शिंदे ,लक्ष्मी जायले ,नीता शिंदे ,शालिनी टवलारे ,मंगल क्षीरसागर, कमलाबाई टवलारे ,चंदन अहिरवार, संजू लवाळे , आदिच्या स्वाक्ष- या आहेत
Users Today : 0