मेहकर
विशेषतः ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ मिळत नाही .चांगली कला असूनही ती लोकांपर्यंत पोहचू शकत नाही.म्हणून दे.माळी येथील तरुण दिग्दर्शक राहुल गवई निर्मित हे असच असतं मराठी वेब सिरीज तयार करण्याचा निर्णय घेतला.आणि चांगला प्रतिसाद मिळाला.गावात विविध गमती जमती घडत असतात आणि त्या पडद्यावर पाहणे लोकांना खूप आवडते .म्हणून चांगला प्रयोग गाव खेड्यात सुरू झाला.ही वेब सिरीज यूट्यूब वर प्रदशित होणार आहे.यामध्ये सह – दिग्दर्शक शशिकांत जाधव, छायांकन क्रिश, क्रिएटिव्ह हेड सिद्धार्थ गवई,प्रॉडक्टन हेड विजय के.गवई ,किसन बळी डॉ. शिवा बळी ,अरुण बळी,बद्री डॉ, राजगुरू सर, सावळर सर, मदन गायकवाड ज्युनियर लक्षा किरण कानोडाजे ,विनोद सोभागे ,अंकिता ,काजल,हर्षदा,अरुण कदम ,अविनाश काळे, पवन गवई ,अजय ,अमर निखिल आणि शिवा असे कलाकार काम करत आहेत.ग्रामीण भागातील मुल – मुलीनी या वेब सिरीज मध्ये काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेब सिरीज मध्ये मूळ गाव शेवगा जहांगीर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली जान्हवी गिरी , Instagram star गाडा – मालक आदित्य भोंडवे ,सिने अभिनेत्री नृत्य दिग्दर्शिका शितल चौगुले मुंबई , इंस्टाग्राम स्टार काजल लोखंडे मुंबई व मराठी चित्रपटात काम केलेले रवींद्र बेर्डे यांनी फोन करून हे असच असतं टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये म.ज्यो.फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,क्रांतीसुर्य तालीम संघ,प्रकाश अर्बन को ओप.क्रेडिट सोसायटी लि.मेहकर शिव शंकर मंडप डेकोरेशन
गाभणे क्लिनिक डॉ प्रवीण गाभणे व ग्रामंचायत व गावकरी मंडळी दे.माळी यांचे विशेष आभार मानले आहेत .आपण सगळ्यांनी ही मराठी वेब सिरीज नक्की पहावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 4