पदविधर मतदारसंघ नीवडणूकीच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार सौ भारती दाभाडे प्रदेश उपाध्यक्षां नी पत्रकार परिषदेत दिले पार्टीचे पत्र

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी अशोक भाकरे
अकोला — अमरावती विधान परिषद निवडणूक पदविधर मतदारसंघ निवडणूकी मध्ये सौ भारती दाभाडे ह्यानी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यावेळी आम आदमी पार्टीचा ए बी फॉर्म त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत  जोडने शक्य झाले नाही त्यामुळे सौ भारती दाभाडे ह्या अपक्ष उमेदवार होत्या मात्र आता मी आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून  सौ भारती यांना पत्रकार परिषदेत सर्वांच्या साक्षीने पत्र देत असल्याने आतापासून  आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून  सौ भरती  दाभाडे   ह्या उमेदवार असल्याचे आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी अकोल्यात हॉटेल जसनागरा येथे जाहीर केले आहे  धनराज वंजारी ह्यांनी मतदारांना आवाहन करतांना सांगितले की शिक्षणाचा वसा आणि वारसा घेऊन देशात अरविंद केजरीवाल प्रयत्न करीत आहे शिक्षण , आरोग्य आणि महिलांना प्रतिनिधीत्व  यावर पार्टीचा मुख्य प्रकाश झोत आहे  त्यामुळे लोकांनी पार्टीला प्रथम क्रमांक पसंती द्यावी असे सांगितले  महाराष्ट्र राज्यात  विधान परिषद निवडणूकसाठी  आम आदमी पार्टीने  राज्यात 3 उमेदवार दिले आहेत  कारण आम आदमी पार्टीने विकासाची साक्षात  गंगा दिल्लीत आणली आहे आणि ही गंगा संपूर्ण देशात आणायची आहे त्यामध्ये दिल्ली प्रमाणे  गुणवत्तापूर्ण शिक्षण , राज्यात आणायचे आहे जे दिल्लीचे मॉडेलसाठी  इटली,जपान,अमेरिका येथील नागरिक अभ्यासासाठी येत आहेत त्यामुळेच पार्टी विस्तारत आहे  अमरावती पदवीधर विधान परिषद निवडणूक मध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून सौ भरती  दाभाडे ह्या आतापासून आम आदमी पार्टीच्या अधिकृत  उमेदवार झाल्या आहेत तसे पत्र त्यांना आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी जाहीरपणे दिले आहे  यावेळी पार्टीचे महानगर संयोजक डॉ खंडेराव दाभाडे,सह संयोजक संदीप जोशी,जिल्हा प्रवक्ता विजय चक्रे,व्यापारी सेल जिल्हा संयोजक   कैलास प्रांजाळे,ठाकुरदास चौधरी, सह कार्यकर्ते उपस्थित होते
0 9 3 7 6 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *