रितेश कुमार टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
:- तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा व आत्मा विभाग तेल्हारा अंतर्गत मौजे उमरी येथे हरभरा पिकाची शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी श्री नरेंद्र राठोड व मंडळ कृषि अधिकारी आडसुळ श्री आर. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सर्वप्रथम हरभरा पिकाचे निरीक्षण घेऊन पिकावर आढळणाऱ्या किडी यांची ओळख प्रत्यक्ष क्षेत्रावर करण्यात आली. पिकावर येणारी कीड व रोग यावरील उपाययोजना कश्या करण्यात याव्या याबाबत शेतकऱ्यांना श्री एस. डी. ठोंबरे कृषी सहायक यांनी मार्गदर्शन केले. हरभरा पिकाला फुले व घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकाचे एकात्मिक किड नियंत्रण करण्यासाठी एकरी 4-5 कामगंध सापळे लावावे जेणेकरून आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्या नंतर उपाययोजना करता येतील.गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी सहायक उमरी श्री. श्रावण मेघ यांनी केले.श्री.संतोष ठोंबरे कृषि सहाय्यक यांनी महाडीबीटी अंतर्गत योजनांची सविस्तर माहिती दिली. समूह सहायक चेतन सावंग यांनी पोक्रा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमा करिता उमरी येथील ज्ञानेश्वर ताथोड, दत्ता ताथोड, ज्ञानेश्वर रोकडे, गजानन शेळके, सुनील शेळके, दिगंबर मोहोड, प्रशांत मोहोड, संतोष दिक्कर, राजेश ताथोड, संदीप शेळके बहुसंख्य गावातील शेतकरी उपस्थित होते.
Users Today : 4