सोयगाव तालुका,गोकुळसिग राजपूत
सोयगाव तालुक्यातील मोलखेडा,हिवरी व सावळदबारा परिसरात डाभा,नादातांडा,देव्हारी, टिटवी व सावळदबारा येथे दि.१९/१/२०२३ रोजी रात्री अचानक वादळाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी विक्रम जयपाल पाटील व गजानन प्रकाश निकुंभ यांच्या गट नंबर ७५ हिवरी शिवरात दोन एकर तर दुसरा शेतकऱ्यांची एक हेक्टर शेतजमिनीतील मका ही पुर्णपणे जमीन दोस्त झाली असून या शेतकऱ्यांच्या मका रब्बीच्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसापासून रिमझिम पाऊस, वादळ सुरू असल्याने मका, कपाशी ,ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे.सोयगाव तालुक्यातील हिवरी येथे परतीच्या पावसामुळे व वादळामुळे मका हे पिक पुर्णपणे कणसात आलेली असतांना ते पिक या वादळाने जमीनदोस्त झाल्यामुळे या आमचे मोठे नुकसान झाले असल्याचे हिवरी येथील शेतकरी गजानन निकुंभ व विक्रम पाटील यांनी औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना सांगितले. शेतकऱ्याने मरावे की जगावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे असे ते म्हणाले त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, शासनाने त्वरित पंचनामा करून आम्हा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुध्दा त्यांनी केली. सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी सुध्दा आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,या वादळामुळे हे शेतकरी त्रस्त झाले असून त्या शेतकऱ्यांना त्वरित शासकीय मदत द्यावी परंतु तलाठी, तहसीलदार हे त्यांच्या शासकीय कामात व्यस्त असल्याने पंचनामा कधी होईल व शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळेल असा प्रश्न देखील शेतक-या बरोबर त्यांनी उपस्थित केला आहे. आधीच बी बियाणेचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी वर्ग कोलमडला असून. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.याप्रसंगी सरपंच मनीषाताई ज्ञानेश्वर वारांगणे, उपसरपंच गुलाबसिंग राणा, एकनाथ पवार,दिपक इंगळे, भास्कर देशमुख शेतात उपस्थित होते.अशी माहिती भूषण राणा हिवरी यांनी दिली
Users Today : 4