पहूरच्या शिरपेचात अजून एक मानाचे मोरपंख ! ६ विद्यार्थ्यांची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड !

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुलींपाठोपाठ २ मुलांनीही  केली सुवर्णपदकांची कमाई !
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आज झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत  पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची दमदार कमाई करत  शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे . जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एकूण सुवर्णपदकांची संख्या ६ झाली आहे .
       पहुर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या
 सतिष सुनिल क्षीरसागर ९ वी व
फरान सत्तार पठाण ८ वी
या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले .त्यांना क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले . त्यांच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार , शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे , शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे , केंद्रप्रमुख भानुदास तायडे , संस्थेचे अध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे , सचिव भगवान आण्णा घोंगडे , मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , श्रीकृष्ण चौधरी  यांच्यासह शिक्षक पालकांनी अभिनंदन केले .
0 9 3 7 6 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *