वाईट विचारांचे दफन करण्यासाठी भागवत कथा श्री,देविकानंद ठाकूर जी महाराज

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर येथे समाजातील वाईट विचारांचे, वाईट कृत्यांचे ,वाईट कर्माचे दफन करण्यासाठी भागवत कथा श्रवण करणे
ही काळाची गरज आहे,असे अमृत वचन श्री देवकीनंदन ठाकुर महाराज यांनी शुक्रवार(ता,२०)रोजी येथील जीवनगंगा परिसरात आयोजित भागवत कथेत केले, आज कथेचा पहिला दिवस ,ते पुढे म्हणाले की,भागवत कथा जीवन जगण्याची कला शिकवते या कथातून संस्कार व नैतिकता ,नीतीमूल्येची उजळणी होते,असेही महाराज पुढे म्हणाले,आज प्रत्येक माता पित्याने आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्याची नितांत गरज आहे, मुलं ही प्रत्येक माता पित्याची संपत्ती असते, संपत्ती महत्वाची नसून सतंती महत्वाची असते हे  प्रत्येक मात पित्याने जाणून भागवत कथेतील संस्कार आपल्या  मुलांवर करून त्यांना आदर्श नागरिक  करावे असे ही ठाकुरजी म्हणाले,सायंकाळी चार वाजता या कथांचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून झाला ,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, माजी शिक्षणाधिकारी ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत,पंकज ठोंबरे,उत्सव समितीचे अध्यक्ष राजुसिंह जोगीलाल राजपूत, कार्याध्यक्ष भावलाल काका सोमासे,मार्गदर्शक योगेश राजपूत,प्रेम राजपूत,सुधीर लालसरे,करण राजपूत,अशोक पवार, यांनी दीप प्रज्वलन केले, सकाळी महाराजांची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली,(फोटो कॅप्शन-दीप प्रज्वलन करतांना नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेश परदेशी,राजू भाऊ राजपूत,भावलाल काका सोमासे,प्रेम राजपूत, करणं राजपूत,)
0 9 3 7 6 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *