मळसूर ते पांगरा रस्त्याचे काम रखडले

Khozmaster
1 Min Read
मळसूर: पातूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्राम मळसुर ते पांगरा रोडचे काम मागील वर्षापासून बंद पडलेले आहे. सदर रस्त्यावर फक्त गिट्टी टाकलेली आहे सार्वजनिक बांधकाम अंतर्गत असलेल्या मळसुर ते पांगरा ते गावंडगाव रोडचे काम बरेच दिवसापासून बंद आहे. त्यामुळे रोडवर बरेच अपघात झाले आहे. तरी सार्वजनिक बांधकामाला अद्याप पर्यंत जाग आलेला नाही या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार फोन करून सुद्धा प्रतिक्रिया मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले .असून या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. या रोडवर गिट्टी टाकल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्याची गरज असताना केवळ थातूरमातूर काम करून मलिदा लाटण्याचं काम सुरू आहे. एकीकडे सरकार रस्त्याच्या कामांना देशभरात गती देत आहे. परंतु मळसुर ते पांगरा रस्ता केव्हा होणार हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या रस्त्यावरून अकोला बुलढाणा वाशिम तीन जिल्ह्याचा हा मुख्य रस्ता आहे. याकडे संबंधित सार्वजनिक बांधकामा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याची हेतूपुर दुर्लक्ष होत आहे.आता मळसुर येथील सोपीनाथ महाराजांची यात्रा 30 जानेवारीला असल्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील या ठिकाणी भक्तगण येत असतात त्यामुळे या रस्त्याचे
 काम यात्रा सुरू होण्याच्या अगोदर करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
0 9 3 7 6 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *