सतीश मवाळ
मेहकर तालुक्यातील उटी येथील
सविता शेषराव धोटे यांच्या स्वतःच्या मालकीच्या कच्चे बांधकाम असलेल्या घराची नोंद गाव नमुना 8 अ ला सिमेंटचे घर म्हणून नोंद केल्यामुळे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिल्याने,व पात्र लाभार्थी सोडून दुसऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाल्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाकडे केली तक्रार
मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत उटी येथील लाभार्थी सविता शेषराव धोटे यांचे उटी येथील मालमत्ता क्रमांक 280 कच्चे पडके घरं होते परंतु तात्कालीन ग्रामसेवक यांनी सदर जागेवर सविता शेषराव धोटे यांचे पक्के घर सिमेंट चुना व दगडाचे अशी गाव नमुना 8 अ ला नोंद केल्यामुळे लाभार्थी घरकुला पासून वंचित राहिल्याने व पात्र लाभार्थ्यांना घरकुल दिल्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे लाभार्थी आज घरकुलापासून वंचित राहला आहे
सदर प्रकाराची योग्य चौकशी होऊन पात्र व्यक्तींना घरकुल मिळावे व यासाठी त्यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे केली तक्रार केली आहे.
मेहकर तालुक्यामध्ये बर्याच गावांमध्ये रमाई योजना चे घरकुल वडिलांना मिळाले तर मुलांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ही लाभ देण्यात एका कुटुंबाला दोन वेळा पक्के घर असून लाभ मिळत आहे. सरपंच सचिव ग्रामसभेचा विषय टाकुन संगणमताने बनवलेल्या याद्यांना सत्यता न पाहता पंचायत समिती ने प्राधान्य दिल्यामुळे खरं लाभार्थी वंचित राहण्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे गाव निहाय सत्यता वरिष्ठांकडून मेहकर तालुक्यातील पाहण्यात येईल का?
ग्रामपंचामध्ये शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या कडे ग्रामपंचायत ची सर्व माहिती असुन शासन नियमानुसार निकाषानुसार पाठली नसल्याने व खरे लाभार्थी झालेल्या सर्वे मधुन वंचित राहण्याची वेळ आली आहे तरी सर्व सामान्य लाभार्थी ची मागणी आहे सध्याची सत्यता न पडताळून न पाहता लाभार्थींना लाभ देण्यात येत आसाल्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही
Users Today : 4