*आ सौ श्वेता ताई महाले यांच्या वतीने चिखलीत रंगणार खेळ पैठणीचा* *सुप्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रमूख आकर्षण

KHOZ MASTER
4 Min Read
चिखली: आ सौ श्वेता ताई महाले पाटील या आमदार होण्याअगोदर आणि झाल्यानंतर सुद्धा चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक सणवार हा सार्वजनिक स्वरूपात राबवित आहेत. यामुळे भारतीय संस्कृती आणि वारसा जोपासण्याचे काम मोठया प्रमाणात होत आहे. आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या दिवशी चिखली विधानसभा मतदारसंघातील जवळपास 80 हजार घरांमध्ये राखी पाठवून पाठवीत असतात तसेच दहीहंडी कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करून संस्कृती जोपासण्याचे काम तसेच मकर संक्रांति निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम  आ सौ श्वेता ताई महाले यांच्या वतीने केल्या जाते यावर्षी सुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने दि २२ जानेवारी २०२३ रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
चला खेळूया ” ‘खेळ पैठणीचा , सन्मान नारी शक्तीचा “
हा विरंगुळात्मक कार्यक्रम आयोजित करून महिलाना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून दोन क्षणांचा विरंगुळा  आणि त्यांच्यातील कला गुणांना वाव देणारा विवीध खेळांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
‘रंग माझा वेगळा’ फेम लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत चिखलीत हळदी कुंकू समारंभ व विविध स्पर्धा होणार असून रोजच्या आयुष्यातील एकसुरीपणा दूर करून मनमोकळा आनंद साजरा करण्याची संधी चिखली शहर व परिसरातील महिला भगिनींसाठी नववर्ष व मकर संक्रांतीनिमीत्ताने आयोजित केल्याने हजारों महिला भगिंनीनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन
आधार बहूउद्देशीय संस्था व तोरणा महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित बुलडाणा द्वारा एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
           दि 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत सुपर गेस्ट हाउस, चिखली येथे ‘पैठणीचा खेळ’ रंगणार असून चिखली व परिसरातील महिला भगिनींना या समारोहास हे स्नेहपूर्वक निमंत्रण आहे. यात पैठणी व इतर अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी तर आहेच; पण या खेळाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे (‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा) यांच्या हस्ते बक्षिस वितरण होणार आहे.
या खेळात तीन स्पर्धा होतील…
 स्पर्धा – 1ः पहिले बक्षिस मानाची पैठणी, दुसरे बक्षिस चांदीचे पैंजण, तिसरे बक्षिस चांदीचा शिक्का, चौथे व पाचवे बक्षिस चांदीचे जोडवे.
 स्पर्धा – 2ः पहिले बक्षिस सोन्याची नथ, दुसरे बक्षिस चांदीचे पैंजण, तिसरे बक्षिस चांदीचा शिक्का, चौथे व पाचवे बक्षिस चांदीचे जोडवे.
 स्पर्धा – 3ः पहिले बक्षिस सोन्याची नथ, दुसरे बक्षिस चांदीचे पैंजण, तिसरे बक्षिस चांदीचा शिक्का, चौथे व पाचवे बक्षिस चांदीचे जोडवे.
*वीर माता आणि विर पत्नी यांचा सुद्धा होणार सन्मान*
       भारत देशासाठी ज्या सुपुत्रानी हौतात्म्य पत्करले चीखली विधान सभा मतदार संघातील त्या वीर पुत्रांच्या वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सुद्धा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
  *महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहण्याचे आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांचे जाहीर आवाहन*
दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने चिखली शहरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम असल्याने
या हळदी कुंकू समारंभात व पैठणीच्या खेळात चिखली शहर व परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केले आहे
0 9 7 2 2 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *