मंदाणे केंद्रात एकदिवसीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन!

Khozmaster
1 Min Read
 प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार –: शहादा  तालुक्यातील मंदाणे केंद्रातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय केंद्रीय क्रीडा स्पर्धांचे लंगडी भवानी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्या रोहिनी पवार, गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी, लोकनियुक्त सरपंच  प्रिती पावरा, सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, निलेश सुळे, मंदाणे केंद्राचे केंद्र प्रमुख परदेशी , लोणखेडा केंद्रच्या पटेल , मंदाणे येथील उपसरपंच शरद साळुंखे, मंदाणे केंद्राचे  मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व गावातील जेष्ठ, व तरुण मंडळी उपस्थित होते.
केंद्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवा या उद्देशाने या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात खोखो, कबड्डी, दोरीउडी, लिंबू चमच, गोणपाट उडी, धावणे, लंगडी,अश्या विविध प्रकारच्या खेळांचे लहान चिमुकल्या मुलां मुलीनं मध्ये रंगविण्यात आले. सामन्यातील विजेता विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, बक्षीस आलेल्या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यां संघाला ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
0 9 3 7 7 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *