जि.प.मराठी शाळेत वन परिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.१५/९/२२ रोजी जि.प.प्राथमिक शाळेत वन परिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे अजिंठा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भारतातून नामशेष झालेल्या वन्य प्राणी चित्ता हा १७ सप्टेंबर २०२२ रोजी मध्येप्रदेश मधील कुरो या व्याघ्रप्रकल्पात आणण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली.देशात १९५२ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेशातून चित्ता नामशेष झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले. आता तब्बल ७२ वर्षांनंतर चित्ता १७ सप्टेबर रोजी भारतात येत आहे, त्याअनुषंगाने अजिंठा वनविभागाने या इव्हेंटची जोरदार तयार फर्दापूर,सावळदबारा परिसरात चालविली आहे.
चित्ता हा शेड्युल्ड १चा वन्यजीव असून, याविषयी शाळा, महाविद्यालयात जनजागृती केली जाणार आहे. प्रचार व प्रसारासाठी वनविभाग पुढाकार घेणार आहे.गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्यापेक्षा चपळ आणि हटके असतो. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषित केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये आँफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. आता मध्ये प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प मध्ये आणून सोडणार आहे. हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात हा चित्ता वास्तव करून राहिणार आहे. तेथे सोलर कुंपण करून त्या चित्तावर निगराणी ठेवली जाणार आहे.अशे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी परिमंडळ अधिकारी अविनाश राठोड, प्रा।जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते),उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान,फकीराभाऊ तडवी, वनरक्षक एस.डी.चाथे,डी.ए.वाघ,जी.पी.नन्नावरे,एस.बी.खडेँ,बी.आर.राठोड,केंद्र प्रमुख एम.डी.सोनोने, भागवत गायकवाड, सतीश ढोणे,निता हिरास मँडम,गवई सर,शिक्षकवृंद,हंगामी वनमजूर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे यांनी दै.खोज मास्तरचे सोयगाव तालुका प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना दिली.
“”केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाच्या गाईडलाईननुसार चित्ताबाबात जि.प.शाळा महाविद्यालयात पोस्टर लावून जनजागृती करण्यात येत आहे. चित्तयाचा इतिहास, भारतातील जुने वास्तव आदी माहिती विद्यार्थ्यांना सावळदबारा परिसरात त्या अनुषंगाने अजिंठा वन परिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे यांनी सांगितले.