IND vs PAK सामना ६ ऑक्टोबरला रंगणार, मॅच किती वाजता सुरु होणार जाणून घ्या संपूर्ण माहिती

Khozmaster
2 Min Read

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील महायुद्ध. त्यामुळे हे महायुद्ध पाहण्यासाठी क्रिकेट विश्वातील प्रत्येक चाहता आतुर असतो. आता भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार हा ६ ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी पाहायला मिळणार आहे. पण हा सामना नेमका किती वाजता सुरु होणार आणि कुठे लाइव्ह पाहता येणार, याची माहिती आता समोर आली आहे.यावेळी भारत आणि पाकिस्तानचा सामना किती वाजता सुरु होणार…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा एकही क्षण कोणीही चुकवणार नाही. पण त्यासाठी हा सामना किती वाजता सुरु होणार, हे पाहणे महत्वाचे आहे. भारताचा पहिला सामना हा न्यूझीलंडबरोबर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु झाला होता. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना संध्याकाळी होणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे.भारत आणि पाकिस्तान सामना कुठे लाइव्ह पाहता येणार…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहता येणार आहे. पण हा सामना जर मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये ओटीटीवर पाहायचा असेल तर हॉटस्टार हा पर्याय चाहत्यांसमोर असणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.गेल्या वर्ल्ड कपमध्ये मिळवला होता दणदणीत विजय…
भारताला महिलांच्या टी २० वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता भारताचा सामना हा पाकिस्तानबरोबर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२३ साली झालेल्या टी २० वर्ल्ड कपमध्ये सामना झाला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानवर सात विकेट्स राखत दणदणीत विजय साकारला होता. आता पुन्हा एकदा टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा संघ सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.भारताला महिला टी २० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर आता भारताचा सामना हा पाकिस्तानबरोबर होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर तो त्यांचा या वर्ल्ड कपमधील पहिला विजय ठरणार आहे. त्यामुळे भारत या सामन्यात विजय मिळवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे हा सामना कोण जिंकतो, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *