वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पराभव, हरमनप्रीत प्रचंड संतापली, मला वाटतं की…

Khozmaster
3 Min Read

दुबई : वुमन्स टी-२० वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय महिला संघाची सुरूवात एकदम खराब झाली. पहिल्याच सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा ५८ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १६०-४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना १०२ वर भारतीय संघ ऑल आऊट झाला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्येही एकदम खराब प्रदर्शन पाहायला मिळाले. त्यामुळे वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर संतापलेली दिसली. सामना नेमका कुठे गमावला याबद्दल हरमनप्रीतने सांगितलं आहे.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो. आता पुढील सामन्यांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त सुधारणा कशावर करावी लागेल हे पाहावं लागणार आहे. कारण पुढील सर्व सामने महत्त्वाचे असणार आहेत. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात आम्ही अनेक संधी निर्माण केल्या होत्या. पण न्यूझीलंड संघाने दमदार खेळ केला. वर्ल्ड कप मोठी स्पर्धा असून इथे तुम्हाला चुका करून चालत नाही. याआधी आम्ही अनेकदा १६० आणि १७० या लक्ष्यांचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे. मात्र या पिचवर न्यूझीलंड संघाच्या १० ते १५ धावा जास्त झाल्या. न्यूझीलंडने केलेली सुरूवात पाहून मला वाटले की ते १८० धावा करतील. वर्ल्ड कपची आम्हाला जशी सुरूवात करायची हवी त्याप्रमाणे झाली नाही, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

सामन्याचा थोडक्यात आढावा

न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डेव्हाईन हिने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने दमदार सुरूवात केली होती, सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी ६१ धावांची सलामी दिली. त्यानंतरच्या काही ओव्हर्समध्य भारताने रन रेटवर काही प्रमाणात अंकुश लावला होता. मात्र कर्णधार सोफी डेव्हाईन ३६चेंडूत नाबाद ५७ धावांची आक्रमक खेळी करत संघाला १६० धावांपर्यंत मजल मारून दिली.भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यावर एकदम खराब सुरूवात पाहायला मिळाली. शफाली वर्मा २ धावा, स्मृती मानधना १२ धावा, हरमनप्रीत कौर १५ धावा, जेमिमाह रॉड्रिग्स १३ धावा, रिचा घोष १२ धावा करून बाद झाल्या. भारताच्या एकाही खेळाडूला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. काही अंतराने विकेट पडत गेल्या आणि १०२ धावांवर भारत ऑल आऊट झाला.भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *