प्रतिनिधी,प्रविण चव्हाण ;नंदुरबार -: शहरातील बालवीर चौक परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच घेण्यात आलेल्या समाज प्रबोधनपर रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रति वर्षाप्रमाणे यंदाही समाज प्रबोधनपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात , राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, वृक्षतोड थांबवा, स्त्रि भ्रूण हत्या रोखा, बालमजुरी, बेटी बचाव, स्वच्छ भारत, योगासन, जलसंवर्धन आदी विषय देण्यात आले होते. विशेष म्हणजे घरोघरी आपल्या अंगणात रांगोळी काढण्याची संधी देण्यात आली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक नम्रता पाटील, द्वितीय वृषाली पाटील, तृतीय राजश्री मोरे, तसेच उत्तेजनार्थ रिया चौधरी, रूपाली चौधरी, देवयानी खेडकर, प्रियंका ढोले, छकुली नुकते, रोहिणी नुकते, प्रतीक्षा राजपूत, रुपेरी वानखेडे, रोशनी गवळी, जागृती भोई, रूपाली भोई यांना रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच नर्मदा इंटरप्राईजेसचे संचालक दिग्विजय रघुवंशी यांच्या तर्फे विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर क्रीडा साहित्य देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सुमेधा गुजराती आणि नेहा गुजराती यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.निर्मल गुजराती, निवृत्त अभियंता आर. एस.प्रजापत, कल्पना प्रजापत, मुख्याध्यापिका सुलभा महिरे, ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे चेअरमन योगेश्वर जळगावकर, डॉ.गणेश ढोले, संभाजी हिरणवाळे, अशोक यादबोले, गोपाल हिरणवाळे, सुदाम हिरणवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.