मालेगाव ता. मागील 14 पंधरा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सुंदर अक्षर कार्यशाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर करण्याचे काम विक्रम पाटील (कलाशिक्षक)अविरतपणे आजही करीत आहेत.खराब अक्षरामुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये टाळाटाळ करतात गृह पाठांमध्ये दुर्लक्ष करत असतात. आत्मविश्वास कमी होणे स्वतःमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून दूर होत जातो.हस्ताक्षर वळणदार आणि सुवाच्य काढावे. अक्षरावरून माणसाची पारख करता येते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नेटकेपणा शिस्त कलात्मकता अशी किती तरी गुण एखाद्या चे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात.. सुंदर हस्ताक्षर हाच खरा अलंकार आहे. श्रवण, उच्चारण भाषण, वाचन आणि लेखन या व्यक्तिमत्व विकासाच्या महत्त्वाच्या पाया आहेत. यातील लेखन हा भाग जाणीवपूर्वक शिकण्याचा आणि कौशल्याचा भाग आहे आपण नेहमी ऐकतो की एखाद्याचे हस्ताक्षर म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. हस्ताक्षर बद्दल अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये पेरले गेले आहेत.खराब अक्षर हा सामूहिक चिंतेचा विषय आहे.ज्या अक्षराभोवती विद्यार्थ्याचा अवघं आयुष्य पिंगा घालत असते त्यावर चर्चा होऊन उपाययोजना होणे महत्त्वाची गोष्ट आहे.. चाणक्य कोचिंग क्लासेस व सई मेडिकल व गाभणे हॉस्पिटलच्या वर मेन रोड मालेगाव, येथे मोठ्या संख्येने विद्यार्थ्याना सहभागी होण्याचे आवाहन. कलाशिक्षक विक्रम पाटील यांनी केले आहे..