राहेर – डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिलाऀ (अंधारे) येथील कृषिकन्या जयश्री अंभोरे या विद्यार्थिनींनी पातुर येथे गजानन ॲग्रो दाल मिल येथे भेट देऊन कडधान्यापासुन डाळ बनवुन त्याची किंमत कशी वाढवली जाईल याची पूर्ण प्रक्रिया जानुण घेतली.शेतकऱ्यांना या प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आणि तेथील काम कसे पार पाडले जाते याची पूर्ण माहिती घेतली.दाल बनवितांना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली जाते.हे समजून घेतले.महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.राम खरडे व ग्रामीण कृषी जागृकता कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.एस.टी.कव्हर , कार्यक्रम अधिकारी पी.ऐ.देशमुख, विषय तज्ञ प्रा.एस.ए.खवणे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.