मालेगाव प्रतिनिधी- कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त सहकार्याने माझा एक दिवस माइया बळीराजासाठी उपक्रमाची सुरुवात 1 सप्टेंबर 2022 पासुन संपुर्ण राज्यभर करण्यात आली आहे. कोरडवाहु शेतक-यांना भेडसावणा-या अडचणी समजुन त्यावर उपाय योजना करण्याच्या हेतुने कृषि विज्ञान केंद्र वाशिमच्या पुढाकाराने मालेगाव तालुक्यातील मौजे भौरद या दुर्गम, डोंगराळ, आदिवासी व दुर्बल गावाची निवड केली आहे. याच अनुषंगाने दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी ग्राम पंचायत कार्यालयात गावचे सरपंच गणपतराव नपते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संभा व संवाद कार्यक्रम घेण्यात आला. या वेळेस कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.आर.एल.काळे, कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.बी.डि.गिते, प्रभारी तालुका कृषि अधिकारी विलास वाघ, कृविकेचे शास्त्रज्ञ डॉ.डि.एन.इंगोले, एस.के.देशमुख, एन.बी.पाटिल, शुभांगी वाटाणे तसेच कृषि पर्यवेक्षक मिलींद कांबळे, कृषि सहायक रवी एकाडे, रुस्तुम सोनुने उपस्थीत होते.प्रास्तावनेत एस.के.देशमुख यांनी पुढिल तीन महिन्यात माझा एक दिवस माइया बळीराजासाठी या उपक्रमाची माहिती व पुढिल कालावधीत राबविण्यात येणा-या क्षेत्र भेटी, अभिसरण, पिक पदधतीत करावयाचे बदल या बाबत सविस्तर चर्चा केली. डॉ.आर.एल.काळे यांनी उपस्थीत गावक-यांशी संवाद साधुन नेमकया गरजा ओळखुन या उपक्रममातुन तंत्रज्ञानाची जोड देण्याबाबत विचार मांडुन एकत्रित गट शेती पदधतीच शेतक-यांना न्याय देवु शकेल या करीता भौरद गावक-यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान केले. पिकांची फेरपालट, एकात्मिक शेती पदधती, फळ पिकांची लागवड, पोषण परसबाग, पुरक व्यवसाय पदधती आदी तत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ.बी.डी.गिते यांनी कृषि विदयापीठाव्दारे शिफारशीत सोयाबीन व तुर पिकाचे उत्पादन वाढिचे मुददे मांडुन पुढिल रब्बी हंगामाकरीता हरभरा व गहु पिकाचे लागवड तंत्राबाबत माहिती दिली. याप्रसंगी डॉ.गिते यांच्या हस्ते होतकरु शेतकरी रुपेश नपते व किशोर चांभापुरे या दोन शेतक-यांना हरभरा पिकाचे नविन वाण कनकचे बियाणे देण्यात आले. तालुका कृषि अधिकारी मालेगाव विलास वाघ यांनी गावात कृषि विभागाच्या योजना, फळबाग लागवड, महाडिबीटी व अभिसरणातुन केलेल्या कामाची मांडणी केली. शेतक-यांच्या गरजा ओळखुन कृषि विदयापीठ, कृषि विज्ञान केंद्र, रोहयो यांचा विविध कामात सहभाग घेवुन शेतक-यांच्या अडचणीवर मात करणार असल्याचे मत मांडले.फळबाग तज्ञ एन.बी.पाटिल यांनी संत्रा व आंबा लागवडीतुन नियमित व शाश्वत उत्पन्नासाठी तंत्रज्ञानाचे बारकावे व गैरसमज या विषयी उदबोधन करुन गावातील संत्रा फळबागांना भेटी देवुन पाहणी केली. गृह विज्ञान विभागाच्या शुभांगी वाटाणे यांनी पोषण आहाराचे महत्व या विषयावर प्रकाश टाकुन महिलांचे श्रम कमी करणारे औजारे व सोयाबीन सोगंणी मोजे वापराचे फायदे सांगुन आहारात सुदधा सोयाबीनचा वापर वाढवावा व महिलांची बेरोजगारीची समस्ये करीता गृह उदयोगाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान सहभागीय पदधतीने शिवार फेरीतुन गावाची माहिती, उपलब्ध संसाधने, राबवित असलेले योजना व एकुणच गावाचे बलस्थाने तसेच समस्या या बाबत चर्चात्मक विकास आराखडा सर्वांच्या उपस्थीतीत घेण्यात आला. तसेच शास्त्रज्ञांनी संत्रा फळबागा, बीबीएफ पदधतीने सोयाबीन लागवड, शेतीपुरक शेळी पालन, बीबा उदयोगची पाहणी व मार्गदर्शन केले.
कार्यक्रम तसेच शिवारफेरीत गावातील तसेच परीसरातील शेतकरी बांधव, महिला, युवक तसेच बचत गटातील सदस्या मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.डि.एन.इंगोले यांनी तर आभार कृषि पर्यवेक्षक मिलींद कांबळे यांनी मानले.